मुलगा: I Love U

मुलगी: माझ्या चप्पल चा नंबर माहिती आहे का ?

मुलगा: ओ हो......

प्रपोस केल नाही की गिफ्ट मागने सुरु झाले...



एकदा सर्व dryfruits पत्ते खेळत असतात.
तर पत्ते कोण वाटणार ?
.
....
.
.
.
उत्तर: पिस्ता!
कारण पत्ते फ़क्त त्यालाच पिस्ता येत...


चिंगी आणि मन्या बागेत बसले होते...
चिंगी: मी आई होणार आहे...

मन्या: नाssssही असे कसे शक्य आहे?? आपण तर...

...चिंगी: ए बावळट तुझ्या बाबांनी मला propose केलं, आता मी तुझी आई होणारआहे...:P :D

दोन मित्र अनेक वर्षांनी भेटतात.
पहिला मित्र: अरे तुझं लग्न झालं की अजून ही हातानेच स्वयंपाक करतोस?
दुसरा मित्र : तुझ्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर 'होय' असंच आहे

डॉक्टर (शीलाला) : तुमच्या नवर्‍याची स्मृति गेली आहे.

शीला : यावर उपाय काय ?

डॉक्टर : ज्या घटनेमुळे यांची स्मृति गेली आहे, ती घटना यांच्याबरोबर पुन्हा घडवली पाहिजे .
...
शीला : (घाईघाईने) जारे पिंट्या , स्व्यमपाकघरातून लाटण घेऊन ये !!!


काय यार, सगळा घोटाळा होऊन बसलाय!" अस्वस्थपणे येरझारा घालत विन्या प्रधान बंडू बावळेला म्हणाला.

" एवढा काय घोटाळा झाला?"

" अरे मी बाप बनणार आहे.."
...
" अरे मग यात घोटाळा कसला. ही तर ग्रेट बातमी आहे, वंडरफुल!"

" बोडक्याची वंडरफुल बातमी! अरे गाढवा, हे माझ्या बायकोला कळलं तर केवढा तमाशा होईल!!"


लग्नाच्या मांडवात नवरा नवरीला म्हणाला, ''तुला माहितीये, लग्न होण्याआधी माझी १० मुलींशी अफेअर्स होती!''

नवरी उत्तरली, ''वाटलंच होतं मला. आपल्या दोघांच्या कुंडल्या जुळल्या म्हणजे सगळेच 'गुण' जुळले असणार ना!!!!!'


पत्नी - माझ्या वाढदिवसाला तुम्ही मला चैन गिफ्ट द्या.

पती - जरुर देईन, बोल कोणती हवी सायकलची का मोटर सायकलची...



एकदा पेशवे महालात आले. त्यांना पाहून एक नोकर बाहेर आला,
पेशवे : "बाई साहेबांना सांग...आम्ही आलो आहोत"
नोकर : "बाई साहेब विसावा घेत आहेत"
पेशवे : "मग बाई साहेबांना सांग...एकविसावा आला आहे"

दोघांचं भांडण झालं होतं.
ती घुश्श्यातच होती.
रागानंच ती म्हणाली, ''मला माहीत आहे, मी मेले की तुम्ही लगेच दुसरं लग्न कराल.'
'मुळीच नाही!' नवरा उत्तरला.

...मी काही दिवस शांत आराम करीन...



पत्‍नी : जेव्हा मी तुमच्याशी बोलत होते तेव्हा तुम्ही सात वेळा जांभई दिलीत.

पती : जांभई नाही दिली, मी तर तुझ्या बरोबर बोलायचा प्रयत्‍न करत होतो...

नवरा - तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.

बायको - मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?

नवरा - तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा...


चम्पू आणि गम्पु गप्पा टाकत बसलेले असतात.

चम्पू- तू एवढा मोठा झालास तरी तुला दाढी, मिशी नाही आली.कसं काय?

गंपू:मी माझ्या आईवर गेलोय...


झंप्याला गुरुजी विचारतात:- सोमवार ते शुक्रवार काम , आणि
शनिवार -रवीवार सुट्टी ही प्रथा कोणी सुरु केली असेल?
यावर झंप्या उत्तर देतो

द्रौपदीने!!!!


माणूस-काल आमच्या घरात शिरलेल्या दरोडेखोराशी मला बोलायचंय.

पोलीस-का?

माणूस- मला त्याला विचारायचंय की माझ्या बायकोला न उठवता तो घरात कसा शिरला?


प्रेयसी प्रियकराला पत्र पाठवते...
प्रिय रोहन जेव्हा पासून तुझ्याशी नाते तोडले आहे तेव्हापासून एक दिवसही सुखाने गेला नाही, रात्रभर तलमलत असते, माझ्या चुकुची जाणीव मला झाली आहे, तू खरच चांगला मित्र आहे, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, अणि हो जाता जाता, तुला १ कोटीची LOTTARY लागल्याबद्दल अभिनन्दन...

गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्लिश मधे म्हणुन दाखव बघु.... "
70, 82, 89, 99"

बबन: "शेवंती, येती तू ?... येत नाय? .. नाय त नाय!!!"


प्रेमिका :- तु लग्ना नंतर सुद्धा मला असेच प्रेम करशील ?

प्रेमी :- हो, जर तुझ्या नव-याने परवांगी दिली तर.

टिप्पणी पोस्ट करा Blogger

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top