लोणावळा, चांगले ठिकाण आहे, दोघांना फिरण्यासाठी. पण माझ्या नशिबात ते नाही. गेले दोन वर्षे नियमीत जातोय, मैत्रिणीला नाही तर मित्राला घेऊन. त्याला GF नाही, म्हणून तो नेहमी सोबत येतो. पण आज काहीतरी वेगळेच वाटतेय. मी लोणावळ्यालाच आहे. माझ्या सोबत माझा मित्रच नाही तर सगळा ऑफिस स्टाफ देखिल आहे. आमच्या कंजुस कंपनी-मॅनेजमेन्ट्ला कसे सुचले कुणास ठाऊक, आज इथे चांगले हॉटेल बुक करून सगळ्यांना घेऊन आलेत.
नेहमी प्रमाणे मी व माझा मित्र बाहेर फिरून हॉटेलमधे परत येतो, ऑफिसचा ईतर स्टाफ देखिल बाहेर कुठेतरी फिरायला गेलेला आहे. मला घरी एक फोन करायचाय म्हणुन मोबाईल ट्राय करतो, पण नेटवर्क चा पत्ता नाही. म्हणुन खाली रिसेप्शन काऊन्टरवर फोन लावायला जातो.
रिसेप्शन काऊंन्टरला तर आमच्याच कंपनीची ऑफिस-कॉर्डीनेटर बसलेय. बॉसने बिचारीला इथेपण ड्युटीवर लावलेय का, मला तीची दया येथे.
सगळे बाहेर फिरायला गेलेत, आणि हि इथे एकटीच काय करतेय मला समजत नाही. कदाचीत कुणाचीतरी वाट बघत असेल. मी रिसेप्शन चा फोन घेऊन सोफ्यावर बसतो, आणि नंबर डायल करतो. तेव्हड्यात ती माझ्या शेजारी येऊन बसते. मी फोन चा रिसीव्हर खाली ठेवतो.
अरे, तु बाहेर फिरायला नाही गेलीस?,.... मी बोलण्याची सुरवात करतो.
नाही,.... ती म्हणते.
का?,.... मी विचारतो.
असच!.... ती म्हणते.
असचं?.... तर मग माझ्या सोबत येतेस का फिरायला?,.... आता पर्यंत छप्पन पोरी फिरवल्या आहेत इतक्या सहजतेने मी तीला विचारतो.
Hmm.. ok ठिक आहे,.... ती देखिल तेव्हड्याच सहजतेने गालावर खळी आणत ऊत्तर देते. आज सुर्य पश्चीमेलातर उगवला नसेल ना.. कुणास ठाऊक. असेल देखिल, बाहेर तर सगळीकडे ढग पसरले आहेत
बाहेर निघताना ती तीचे जॅकेट घेते, तर मी छत्री घेतो. बाहेर काही वेळापुर्वीच पाऊस थांबला आहे, पाण्याचे प्रवाह ठीकठीकाणी भरून वाहतायेत. हॉटेलच्या जवळच सेंट् मेरी व्हिला नावाचा एक चांगला स्पॉट आहे. माझा फेव्हरेट. आतापर्यत कितीतरी फिल्म्सच्या-गाण्याच्यां शुटींग इथे झाल्या असतील. आज इथे कोणच नाहीये, फक्त आम्ही दोघे. दरीतुन येणारे ढगांमुळे क्लायमेट मस्तपॅकी रोमॅटींक झालेय. दोघेही पाण्याच्या ओहोळांवरून उड्या मारत एकमेकांना सांभाळत दरीच्या कड्यापर्यंत पोहोचतो. ती जरा जास्तच ऍडव्हेन्चरस आहे.
दरीतुन ढगांआड मला waterfall दाखवत म्हणते.... Its so beautiful ...ना?
मी मात्र waterfall च्या एवजी तीलाच जास्त बघतोय.
जास्त पुढे नको जाऊस, Its quite slippery here.... मी तीला सुचना करतो,
ती दोन पावले मागे येते.
कंपनीत ईतके दिवस सोबत होतो, पण आम्ही कधी फोनवर ऑफिशीअल बोलण्यापलीकडे गेलो नव्हतो. समोरासमोर क्वचीतच बोलणे झाले असेल. आज हातात हात घेऊन फिरतोय, खुप वर्षांपासुन एकत्र असल्या सारखे. कशाचीच पर्वा नाही....
....प्रिये... मनातही.. काजवा.. नवा नवा... मिलींद ईगंळेंच्या गारव्याच्या ओळी मला अचानक आठवतात. माझा हात पुढे करून तिच्या मनाला साद घालावीशी वाटते.
मी तीच्याकडे पाहतो,
ती नजरेनेच ....काय? असे विचारते.
काही नाही गारव्याच्या ओळी आठवल्या....मी म्हणतो.
ती गोड हसते... अन् मी देखील.
दोघेही पुन्हा एकदा ढगांआड उसळणारे पाण्याचे झरे शोधायला लागतो.
ईतक्यात माझ्या पाठीवर एक थाप पडते, वळून पाहतो तर माझा मित्र प्रश्नार्थक चेहरा करून ऊभा आहे. हा कशाला ईथे आला, मला खरोखर त्याचा राग येतो. ती मात्र चेहय्रावर कोणतेही हावभाव न आणता दुरवर पहात असते.
काय रे, जुन्या मित्रानां विसरलास का?.... तो विचारतो
अरे नाही तर. असच सहज फिरायला आलो होतो...
पण नेहमी तर माझ्या सोबत फिरतोस ना?.... तो ऊगाचच निरागसतेचा भाव चेहय्रावर आणत विचारतो.
बरं झाले ती दुर आहे, तीला आमचे बोलणे एकू जात नसेल.... कदाचीत
थोड्यावेळात आम्ही हॉटेल कडे परत येतो.
हॉटेलमधे सर्वजण गरमागरम सुप पिण्यात बिझी आहेत. माझा मित्र देखिल त्याच्या मधे गायब होतो. इतरांना तो माझ्याबद्दल गॉसिप वैगेरे काही सांगणार नाही याची मला खात्री आहे, मित्र आहे ना..
आम्ही दोघे मात्र रूमकडे वळतो. तीच्या डोअर पर्यंत आल्यानंतर ती जॅकेटमधुन रूमची चावी काढते. माझी रूम वरच्या मजल्यावर आहे.
तीच्यापासुन दुर जाण्याआगोदर मी थोडावेळ तिथेच थांबतो.
Thanks!... मी म्हणतो.
कशासाठी?.... ती विचारते.
माझ्यासोबत आल्याबद्दल,.... मी म्हणतो.
No, Thax to you.... for such a nice trip, तुझ्यासोबत मी सुध्धा Enjoy केले,....
ती पुन्हाएकदा गालावर गोड खळी आणत म्हणते.
Well,....Actually तुझ्या आगोदर मी कधी कुणासोबत Dating वर गेलो नव्हतो....
मी विषय वाढवतोय.
Oh really? दरवाजाच्या चाव्या सोडून ती माझ्याकडे वळते.
ती माझ्या जवळ आलेय, फक्त एका फुटाचे अतंर आमच्यात ऊरलेय. मी तिच्या डोळ्यांमधे हारवत चाललोय अन् ती माझ्या. बाहेरचा पाऊस आणि वारा या क्षणाप्रमाणेच थांबलेले वाटतायेत. सर्व काही स्थब्ध झाल्यासारखे वाटतेय, आणि......
तितक्यात आमचा बॉस कुठुनतरी ऊगवतो. दोघेही त्याच्या अचानक येण्याने भांबाऊन गेलो आहोत. हा ईथे कशाला आला, निट गप बसुन सुप गिळता येत नाही का...मी मनातल्यामनात म्हणतो
अरे तुम्ही अजुन ईथेच?... तो विचारतो. त्याने माझ्या मनातला विचार कदाचीत ओळखला आहे
दोघानांही काय बोलावे सुचत नाही
दोघेजण एकत्र हं! काय विचार काय आहे, यावर्षी लग्नाचे लाडू मिळणार वाटतय....Tont मारून तो हसत बसतो आणि निघून जातो ..
. बॉस आहेना.. काहीही बोलण्याची परवानगी आहे.
मला घाम सुटायला लागलाय, ति गालात हसते आणि लाजुन तिच्या रूम मधे जाते ...
तिच्या पाठमोरया आकृतिकडे पाहताच राहतो ... आणि मनात नकळतपने तेच गाण सुरु असत ..
" ...प्रिये... मनातही.. काजवा.. नवा नवा...गारवा !!!! "
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook