माझी प्रेयसी..........
माझी प्रेयसी गोरी आहे
जणू चीकन तंदुरी आहे ,
तिच्यावीषयी काही बोलण्याची
मला मात्र चोरी आहे .
माझी प्रेयसी गोड आहे
हापूस आंब्याची फोड आहे
नवर्याला मुठीत ठेवीन अशी
तीला भारी खोड आहे .
माझी प्रेयसी सोज्वळ आहे
डोळ्यात तिच्या काजळ आहे
माझ्या वीषयी तिच्या
मनात तळमळ आहे
माझी प्रेयसी भित्री आहे
वटवट सावित्री आहे .
तीचे माझे पटणार नाही
ह्याची मला खात्री आहे .
माझी प्रेयसी मस्त आहे
स्वभाव तिचा थोडस सुस्त आहे .
तिच्यापेक्षा मी बावळट आहे
म्हणून ती निर्धास्त आहे .
माझी प्रेयसी हट्टी आहे
स्वभाव तीचा थोडासा कपटी आहे
एका शुल्लक कारणावरून
कालपासून आमची कट्टी आहे .
Post a Comment Blogger Facebook