"सांगू शकत नाही मी तूला
तू आहेस तरी किती सूंदर
शब्द-शब्द वेचून केली जरी कविता
तिला ही येणार तुझी सर || १ ||
सांगू शकत नाही मी तूला
तू आहेस तरी किती सूंदर
एक-एक पुस्तक लिहायला गेलो त्यावर
पाने ही अपुरी पडतील त्यासमोर || २ ||
सांगू शकत नाही मी तूला
तू आहेस तरी किती सूंदर
करता-करता तुझ्या सौंदर्याची तारीफ
दिवस काय रात्रीचाही मला पडतो विसर || ३ ||
सांगू शकत नाही मी तूला
तू आहेस तरी किती सूंदर
सकाळी-सकाळी घराबाहेर पडताना
दर्शन तुझ घेण्यासाठी होतो मी आतुर || ४ ||
सांगू शकत नाही मी तूला
तू आहेस तरी किती सूंदर
कधी-कधी मलाच अस वाटत
माझी लागेल तूला नजर || ५ ||
By कल्पेश"
Post a Comment Blogger Facebook