हसत ये तू कधी ही . . .
हसत ये तू कधी ही
तयारी करुन ठेवली आहे .
एक दिवस संपायचेच आहे
सामोरे जायची कला मी शिकली आहे.
नाही मी घाबारनार आणि नाही कोणी ही रडणार
आयुष्यभर सर्वाना हसण्याची सवय मी लावली आहे
हसत ये तू कधी ही
तयारी करुन ठेवली आहे .
तिकडे हिशोब द्यावा लागतो म्हणुन
रोजनिशी रोज लिहिली आहे .
स्वतसाठी ही नाही तर इतरांसाठी ही
किती तरी पाने त्यातली भिजली आहे .
नाही दावा फार मोठी समाजसेवा.
हातून माझ्या घडली आहे.
काठी ने शारीर सावरत इतराना
उभे करायची सवय मला जडली आहे
हसत ये तू कधी ही
तयारी करुन ठेवली आहे .
चाळीचा फ्लैट करता करता
उमर ही ढळली आहे .
सगळी कर्तव्य पूर्ण केलि
पोरांनी बंगल्याची भिंत आता बांधली आहे .
हसत ये तू कधी ही
तयारी करुन ठेवली आहे .
किती दिवस हे आसे थकलेले
शरीर घेवून जगणार
झाल्या होत्या काही चूका
त्यासाठी पुन्हा पुन्हा रडणार
तरी ही इतकेच सांगेल त्या
चूका इतरांकडून होवू नये म्हणुन
बदनामी ही स्वताच्याच माथी मारली आहे.
का सोस करायचा आयुष्याचा
साठी माझी दोन वर्ष्य पुर्वीच सरली आहे
लवकर ये तुझ्या आगमनाची
हुरहुर मानत भरली आहे
हसत ये तू कधी ही
तयारी करुन ठेवली आहे

Post a Comment Blogger

 
Top