भेटूया का?..
ओथंबलेल्या घनात ..
त्या रिमझिमत्या पावसात ..
नको उघडूस ती छत्री,
जरा भिजुदेत ना सरी
भेटूया का?..
झोंबत्या गार वाऱ्यात ..
त्या कोसळत्या धबधब्यात ..
घेवुन हात तुझा हातात,
जरा सावरुदेत ना खडकात
भेटूया का?..
उधळत्या सागर लहरीत ..
त्या बांधावर छत्रीत ..
सामावत तुझ्या मिठीत,
जरा लाजुदेत ना खळीत
भेटूया का?..
गोड गोड स्वप्नात ..
त्या फुललेल्या बनात ..
हरवेन मी हरपेन मी,
पुन्हा शिरता त्या क्षणात
Post a Comment Blogger Facebook