या क्षणाला जर आलीस परत.
तरच कदाचीत जगेन मी,
पुढच्या क्षणाला जरी आलीस धावत,
तेव्हां या जगातच नसेन मी..

तु नसतांना कळतय मला
महत्व तुझ्या असण्याचं
आता कुठे गवसतंय मला
ध्येय माझ्या जगण्याचं

शब्दांपेक्षा सुध्दा अधिक
स्पर्श असतो बोलका म्हणे
म्हणून काही बोलण्यापेक्षा
मी मिठीतच तुला भरतो सये..

त्या मीठीची मिठास काहि और होती
जीवनात रंग भरत माझ्या चालुन
आलेली ती चांदणी रात्र होती
आज हि मिठी आणि तीचा आभास आहे
आज हि माझ्या आठवणीत ती चांदणी रात्र आहे.

क्षण क्षण जगून मी
आता भुतकाळ झालो आहे
सावळी देनारे झाड होतो
आता राख झालो आहे.






टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top