तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो.
जेव्हा एकटं एकटं रहावसं वाटतं
गोड हसणं मनातल्या मनात दाटतं
कुणाचं तरी आपलेपण ह्र्दयात साठतं
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो.
उघड्या डोळ्यांना स्वप्न पडतात
प्रेमपाखर ही हसत रडतात
स्वप्नांशी नाती जडतात
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो.
इंद्रधनुचा प्रत्येक रंग अजुन तेजस्वी होतो.
वैशाख ही हिरवा होवुन् जातो.
सारा परिसर मंत्रमुग्ध होतो.
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो.
थंड हवा मंजुळ होवुन जाते
चंद्राची कोर नवरुप घेते
आकाशाचं छतं चांदण्यांनी भिजून जाते
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो.
जेव्हा फक्त तिचीचं आठवण य़ेते.
फक्त ती आणि ती दिसते सगळीकडे
अशक्य गोष्ट शक्य झाल्यासारखी वाटते
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो.
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook