प्रेमाची एक वेगळी भाषा आणि संदर्भ असतात , हे या टप्प्यावरून गेल्यावरच समजतं . काहींच्या मते , ही भाषा डोळ्यांनी व्यक्त होऊन मनाला समजते , तर काहींच्या मते , चेह-यावरील हावभाव पुरेसे असतात . प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते . पण तरीही जगभरातील प्रेमात काही गोष्टी कॉमन असतात . तुम्ही कुणावर प्रेम केलं असेल तर थोडासा विचार करा . ही लव्हॉलॉजीची एबीसीडी कळतनकळत तुम्हालाही परिचयाची झाली असेल .

' ए ' : अॅट्रॅक्शन म्हणजेच आकर्षण

प्रेमाची सुरुवात त्याच्या / तिच्याकडे आकषिर्त झाल्यामुळे होते , हे वेगळं सांगायची गरज आहे का ?

' बी ' : बॅचलर

ही डिग्री गमावून बसण्याच्या प्रक्रियेला प्रेमानेच तर सुरुवात होते . काहींच्या आयुष्यात हा क्षण वारंवार येतो , तर काहींच्या आयुष्यात हा योग लग्नानंतरच येतो .

' सी ' : क्यूट

तो / ती प्रत्येक क्षणी क्यूट वाटायला लागली की तुम्हाला प्रेमाचा फिवर चढलाच समजा .

' डी ' : डिच म्हणजेच फसवणं

प्रेमात कुणी दुस - याला डीच केलं तर त्या व्यक्तीने कधीच तिच्यावर प्रेम केलं नव्हतं , असं समजावं .

' ई ' : इगरनेस म्हणजेच तीव्र इच्छा

भेटणं , पाहणं , बोलणं अशा त्या दोघांच्या प्रत्येक हालचालीत प्रेमाची तीव्र इच्छा दडलेली असते .

' एफ ' : फ्लावर अर्थातच फुलं

प्रपोज करायचंय , राग घालवायचाय , खुश करायचंय , सरप्राइज द्यायचंय ... तुम्हाला काय करायचं , हा पेच पडला की छानशी फुलं विकत घ्यायची . अर्धा प्रॉब्लेम तिथेच सोडवता येतो .

' जी ' : गिफ्ट

हल्ली गिफ्ट हे प्रेम मोजण्याचं उत्तम परिमाण झालं आहे . त्यातील दिखाऊपणाचा भाग वगळला तर हा प्रेम व्यक्त करण्याचा एक चांगला पर्याय होऊ शकतो .

' एच ' : हॉट

फिलिंग हॉट , हॉट , हॉट . प्रेमातील एक हॉट फिलिंग काही काळानंतर पर्सनॅलिटीमधूनही दिसून येतं . त्याला / तिला आवडेल म्हणून खूप छान म्हणजे आजच्या भाषेत हॉट दिसण्याचा प्रयत्न केला जातो .

' आय ' : इलू

' सौदागर ' चित्रपटाने काय दिलं , असं विचारलं तर इतका कठीण प्रश्न का विचारता , असा प्रतिप्रश्न विचारला जाईल . ' आय लव्ह यू ' चा शॉटफॉर्म यातून प्रसिद्ध झाला . आज एसएमएस करताना या शॉर्ट आणि स्वीट शब्दाचा

वापर केला जातो .

' जे ' : जेलस म्हणजेच मत्सर

तुम्हे कोई और देखे तो जलता है दिल , यावरून जेलसीची तीव्रता लक्षात येते . प्रेमात पडल्यावर आपल्या मनात मत्सर भावना दडली आहे , हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही .

' के ' : किस्स

कधीही न विसरता येणारे ते नाजूक क्षण .

' एल ' : लव्ह म्हणजेच प्रेम

लव्हॉलॉजी विषयाचा पाया याच संकल्पनेने रचला गेला आहे . जगातील संपूर्ण साहित्यात याची परिपूर्ण व्याख्या मिळणं कठीण , यावरून या शब्दाची व्याप्ती तुम्हाला कळू शकते .

' एम ' : मनी म्हणजेच पैसा

प्रेमाने पोट भरत नाही , हे कळण्याचा टप्पा आणि त्यावरचं उत्तर म्हणजे पैसा .

' एन ' : नॉटी म्हणजेच खोडकर

माझं तुझ्यावर किती किती प्रेम आहे ... हे खूपचं बोअरिंग वाटतं ना ! इथेच या नात्यात थट्टा - मस्करीचा प्रवेश होतो . पण हे जरा जपून .

' ओ ' : ऑप्टिमिस्टिक म्हणजेच आशावादी

उम्मीद पर ही दुनिया कायम है ... असं प्रेमात पडल्यावर वारंवार बोलावं लागतं . ती आपला निर्णय घरी कळवते , तुम्ही पहिल्यांदा तिच्या घरी जाता असा प्रसंग वेगळा असतो , पण मदतीला येणारा आशावाद तोच असतो .

' पी ' : फिजिक्स

हल्ली फिजिकल केमिस्ट्री , गेटिंग फिजिकल , असे शब्द वापरले जातात . शारीरिक आकर्षण हे त्याचं मूळ आहे . पण हा मुद्दा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो .

' क्यू ': क्वीन

तिला कायम राणीसारखं मानावं लागतं . तिच्या कोणत्याही इच्छेचा अवमान केलेला चालत नाही . शेवटी तिला तुमच्या हृदयाचं सम्राज्ञीपद द्यावंच लागतं , प्रेमातील ही एक अपरिहार्य गोष्ट आहे .

' आर ' : रोमान्स म्हणजेच अद्भुत किंवा रम्य अनुभव

रोमॅण्टिक व्यक्तींना त्यांच्या नातेसंबंधात प्रेमाचे रम्य रंग भरण्यासाठी खास प्रयत्न करावे लागत नाही , तर काहींच्या आयुष्यात नियोजन करूनही असं रोमॅण्टिक घडत नाही . लक फॅक्टर इथे मोठी भूमिका बजावतो .

' एस ' : स्वीट

प्रेमात पडल्यावर प्रत्येक गोष्टीला स्वीट हा शब्द जोडायला विसरायचं नाही . प्रेमात हार्ट , ड्रीम्स असं सगळंच न सांगता स्वीट होऊन जातं .

' टी ' : टॉलरन्स म्हणजेच सहनशक्ती .

प्रेम आणि सहनशक्ती असे एकाच नाण्याचे दोन पैलू असतात , हे अनुभवावरून लक्षात येईल . इथे तुम्ही कळत नकळत दुसऱ्या व्यक्तीची जबाबदारी स्वीकारलेली असते . त्यामुळे जितकी सहनशक्ती तुमच्याकडे जास्त तितका प्रेमाची गोडी अधिक वाढते .

' यू ' : ' अस ' म्हणजेच आम्ही

प्रेम निव्वळ स्वत : चा विचार करणारी संकुचित विचारसरणी सोडायला भाग पाडतं . हीच प्रेमाची जादू असेल .

' व्ही ' : व्हीक्टरी म्हणजेच जिंकणं

तिचं / त्याचं हृदय जिंकणं हे तुम्ही हृदय हरल्याशिवाय शक्य होत नाही . हा अजब व्यवहार इथे आवडीने करावा लागतो .

' डब्ल्यू ' : विल म्हणजेच इच्छाशक्ती

प्रेमात खूप काही सिद्ध करून दाखवावं लागतं . त्यासाठी आवश्यक असणारी एनर्जी तुम्हाला इच्छाशक्तीतून मिळते .

' एक्स ' : एक्स - बॉयफ्रेण्ड किंवा गर्लफ्रेण्ड

हे अक्षर आधीच्या प्रेमातील नात्यांचं वर्णन करताना मदतीला धावून येतं .

' वाय ' : यंग

तुम्ही यंग अॅट हार्ट असाल तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रेमात पडण्याचं दिव्य करता येतं .

' झेड ' : झील म्हणजेच आस्था

तो दूर का असेना , पण सुखात असावा . ती कुठेही राहो , खूष राहावी . ही आस्थाच त्या प्रेमवेड्या दोन जीवांना जपत असते .


टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top