अशेच बसले होते समुद्रकिनारी
तुजे नाव वालू वर लिहत
पण वारा बघ ना
संत वाहत नाही
समुद्र शांत आहे
पण किनारा लाटेस व्याकुळ
सूर्यास्ताला का दोघांची
गाठभेट नाही
दिवसभर असतात खेळत
लाटेचे किनारयाला आलिंगन
पण सान्ज होताच
कस हे विरहाच कृषण
आठवाची होते डट्टीगट्टी
मग डोळ्यात
अंग शहाराही
पाट सोडत नाही
वाट पाहता पाहता सान्ज होत
माझे पावुल मग तिथेच अडते
मन खट्याळ मानत नाही
देह असूनही त्यात प्राण नाही
सान्ज सरताच चांदण्याही बघ ना
कशा चीडून जातात
चंद्र जवळ असूनही
मला कशा दूर दूर नेतात
कळत नाही वेळेला काय हवे
पण मनाला एकच ठावुक
सकाळची वाट पाहणे...............
कवियत्री - संजीवनी
SUBMITTED BY ( आभार ) : शरयु
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook