( धन्वंतरी पूजन पुढील प्रमाणे करावे - अशोककाका कुलकर्णी )


प्राचीन काळी जेव्हा देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले,तेव्हा धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते.याच कारणामुळे धनत्रयोदशीला धन्वंतरी आणि औषधींचे पूजन केले जाते.पुराणांमध्ये धन्वंतरी देवाला भगवान विष्णूंचा अंशावतार मानले गेले आहे.


पूजन विधी


सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.


सत्यं च येन निरतं रोगं विधूतं, अन्वेषित च सविधिं आरोग्यमस्य।

गूढं निगूढं औषध्यरूपम्,धन्वन्तरिं च सततं प्रणमामि नित्यं।।


भगवान धन्वंतरी यांची मूर्ती किंवा प्रतिमा पवित्र ठिकाणी स्थापन करून स्वतः पूर्व दिशेला मुख करून बसा.


देवान् कृशानसुरसंघनिपीडिताङ्गान्

दृष्ट्वा दयालुरमृतं विपरीतुकामः ।

पाथोधिमन्थनविधौ प्रकटोऽभवद्यो धन्वन्तरिः स भगवानवतात् सदा नः ॥

ध्यानार्थे अक्षतपुष्पाणि समर्पयामि ॐ धन्वन्तरिदेवाय नमः ।


गंधाक्षत अर्पण करून पूजन विधी सुरू करावा

 

पाद्यं , अर्घ्यं , आचमनीयं समर्पयामि ।

ॐ धन्वन्तरये नमः । स्नानार्थे जलं समर्पयामि ।


आचमन प्राणायाम पूर्ण करावे व पळीभर पाणी सोडावे 


ॐ धन्वन्तरये नमः । पंचामृतस्नानार्थे पंचामृतं समर्पयामि । 


पळीत पंचामृत घेऊन स्नान घालावे .


पंचामृतस्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि ।


परत शुद्ध पाणी घालावे


ॐ धन्वन्तरये नमः । सुवासितं इत्रं समर्पयामि ।


अत्तर लावावे


ॐ धन्वन्तरये नमः । वस्त्रं समर्पयामि ।


वस्रे अर्पण करावे


ॐ धन्वन्तरये नमः । गन्धं समर्पयामि ।


गंध लावावे


ॐ धन्वन्तरये नमः । अक्षतान् समर्पयामि । 


अक्षता अर्पण कराव्यात


ॐ धन्वन्तरये नमः । पुष्पं समर्पयामि ।


फुले अर्पण करावीत


ॐ धन्वन्तरये नमः । धूपम् आघ्रापयामि । 


उदबत्ती ओवाळावी


ॐ धन्वन्तरये नमः । दीपकं दर्शयामि ।


निरंजन ओवाळावी


ॐ धन्वन्तरये नमः । नैवेद्यं निवेदयामि ।


नैवेद्य दाखवावा


ॐ धन्वन्तरये नमः । आचमनीयं जलं समर्पयामि ।


ॐ धन्वन्तरये नमः। ऋतुफलं समर्पयामि । 


फळे अर्पण करावीत


ॐ धन्वन्तरये नमः । ताम्बूलं समर्पयामि ।


तांबूल विडा अर्पण करावा


ॐ धन्वन्तरये नमः । दक्षिणां समर्पयामि ।


दक्षिणा ठेवावी

 

ॐ धन्वन्तरये नमः । कर्पूरनीराजनं समर्पयामि ।


कापूर निरंजन 


ॐ धन्वन्तरये नमः । नमस्कारं समर्पयामि ।


शेवटी हात जोडून खालील प्रार्थना म्हणावी


अथोदधेर्मथ्यमानात् काश्यपैरमृतार्थिभिः । उदतिष्ठन्महाराज पुरुषः परमाद् भुतः ॥

दीर्घपीवरदोर्दण्डः कम्ब्रुग्रीवोऽरुणेक्षणः । श्यामलस्तरुणः स्रग्वी सर्वाभरणभूषितः ॥

पीतवासा महोरस्कः सुमृष्टमणिकुण्डलः । स्निग्धकुंञ्चितकेशान्तः सुभगः सिंहविक्रमः ॥

अमृतापूर्णकलशं विभ्रद् वलयभूषितः । स वै भगवतः साक्षाद्विष्णोरंशांशसमम्भवः ॥


रोग नाशच्या इच्छेने खालील मंत्राचे स्मरण करा


ऊं रं रूद्र रोग नाशाय धन्वन्तर्ये फट्।।


यानंतर भगवान धन्वंतरीला श्रीफळ अर्पण करून आरती करा.


धन्वंतरी आरती

कमलनयन श्यामवर्ण पितांबर साजे । 

मनमोहन वस्त्राने आदिदेव विलसे । 

शंखचक्र जलौक अमृतघट हाती । 

चतुर्भुजानी अवघ्या दुःखाला पळवी || 


जय देव जय देव धन्वंतरी देवा । सकळ जनांना द्यावा आरोग्य ठेवा ||धृ || 


देवांनी दैत्यांनी मंथन ते केले । 

त्यातुन अमृत कलशा घेवुनिया आले । 

भय दुःख तरण्या जरा मृत्यू हरण्या । 

सकळांना त्यांचे संजीवन झाले ||


जय देव जय देव धन्वंतरी देवा । सकळ जनांना द्यावा आरोग्य ठेवा || धृ ||


शास्त्रांचे परिशिलन अनुभव कर्माचा ।

बुध्दिने तर्काने तत्पर ती सेवा । 

शुचिर्दक्ष सत्यधर्म संयत औदार्या । 

श्रीकांत सह साऱ्या आशीर्वच द्यावा ।।


जय देव जय देव धन्वंतरी देवा । सकळ जनांना द्यावा आरोग्य ठेवा || धृ ||

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top