ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....
कधी काळी सदैव माझ्यासोबत राहणारी,
तर कधी माझ्या नजरेला नजर देणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....
... कधी काळी माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडणारी,
तर कधी माझ्या स्पर्शानी मोहरून जाणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....
कधी काळी माझा तोल जाताच मला सावरणारी,
तर कधी इतर मुलीँकडे पाहिले म्हणून रुसणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....
कधी काळी मला आनंदी पाहूऩ समाधानी होणारी,
तर कधी मला दु:खी पाहून अश्रु ढाळणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....
कधी काळी हा जन्म तुझ्यासाठीच घेतला असे म्हणनारी,
तर कधी मरेपर्यँत तुझीच राहील असे वचन देणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....
कधी काळी मी सिगारेट ओढली म्हणून अबोला धरणारी,
तर कधी मी दारू प्यालो म्हणून माझ्याशी भांडणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....
कधी काळी त्या व्यसनांपासून दूर रहा असा सल्ला देणारी,
तर कधी त्या व्यसनी मित्रापासून दूर रहा अशी सक्त ताकिद देणारी,
ती आज मात्र 'त्याच' मित्रासोबत निघून गेली....
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
मुलांच्या जीवनात सुद्धा असे प्रसंग येवु शकतात
ReplyDeleteहो असे प्रसंग खरे प्रेम करणार्या प्रत्येक मुलाच्या जिवनात येऊ शकतात
ReplyDelete