हुशार , स्मार्ट , हार्ड वर्किंग आणि महत्त्वाकांक्षी तरुण हीच मुलींची पहिली पसंती असते .
प्रेम व्यक्त करण्यासाठी चांदतारे आणायला पाहिजेत , असं अजिबात नाही . छोट्या छोट्या गोष्टींतूनही प्रेम व्यक्त करता येतं .
इमोशनल झाल्यावर आम्हाला थोपटणं , मिठीत घेणं किंवा एक प्रेमळ मिठी ... बस्स आणि काय हवं ?
वेळोवेळी प्रेम व्यक्त करायला शिका .
बर्थ डे किंवा अशाच प्रसंगी तुम्ही दिलेलं सरप्राइज आमच्यासाठी खूप मोठं गिफ्ट असतं .
तुम्ही ड्राइव्ह करता , तेव्हा आम्ही ते एन्जॉय करतो ना ? मग , आम्ही ड्राइव्ह करतानाही एन्जॉय करायला शिका .
आपली डेट रोमॅण्टिक डेट होईल , याची काळजी तुम्हीच घेतली पाहिजे .
तुमच्याबरोबर कॅण्डल लाइट डिनर घेणं याहून अधिक सुखद अनुभव कोणता असू शकतो ?
आम्हाला तुमच्या एकट्यासोबत हक्काचा काही वेळ रोमॅण्टिकली घालवायला खूप आवडतो .
थोडंफार जग आम्हालाही कळतं . म्हणूनच आम्ही केलेल्या सूचना , आमचं मत विचारात घ्यायला हरकत नाही .
आम्हालाही स्पेस हवी हे लक्षात ठेवा .
तुम्ही जसे आहात , तसेच तुम्ही आमचे असता . मग , आम्ही जशा आहोत , तसंच तुम्ही आम्हाला स्वीकारायला हवं .
हो , आम्ही खूप पझेसिव्ह असतो आणि खूप सेन्सिटिव्हसुद्धा ! आमचं असं वागणं समजून घ्यायलाच हवं .
तुमच्या फॅमिलीचा आदर आम्ही ठेवतो . त्यांना आमचं समजतो . तुम्हीसुद्धा आमच्या आईवडिलांना स्वत : ची फॅमिली समजलंच पाहिजे .
साभार - लेखिका: मंजिरी फडणीस
शब्दांकन : मिताली मापुस्कर
ha he tar barobar aahe..ki amhi jase aahot tashyach mulihi aamhala swikartat mag amhi hi tyana tasach swikala pahije....<3..<3..<3..thanks for sugetion..<3
ReplyDelete