हा चंद्र तुझ्यासाठी
ही रात तुझ्यासाठी
आरास ही ता-यांची
गगनात तुझ्यासाठी... २

कैफ़ात अश्यावेळी
मज याद तुझी आली
ये ना!!!!!!!!!!!!!!!!!!
मोहरत्या स्वप्नांना घेवुन ये तु
थरथरत्या स्पर्शांना घेवुन ये तु
अनुरागी रसरंगी होवुन ये तु
नाजुकशी एक परी होवुन ये तु

वर्षाव तुझ्या तारुण्याचा
रिमझिमता माझ्यावरी होवु दे
रेशिम तुझ्या लावण्याचे
चंदेरी माझ्यावरी लहरु दे
नाव तुझे माझ्या ओठी येते
फ़ुल जसे ही खुलताना दरवळते

इतके मज कळते अधुरा मी इथे
चांद रात ही बघ निसटुन जाते

बांधिन गगनास झुला
जर देशील साथ मला
ये ना!!!!!!!!!!!!!!!!!!
मोहरत्या स्वप्नांना घेवुन ये तु
थरथरत्या स्पर्शांना घेवुन ये तु
अनुरागी रसरंगी होवुन ये तु
नाजुकशी एक परी होवुन ये तु

हे क्षण हळवे एकांताचे
दाटलेले माझ्या किती भोवताली
चाहुल तुझी घेण्यासाठी
रात्र झाली आहे म ऊ मखमाली
आज तुला सारे काही सांगावे
बिलगुनिया तु मज मजला ते ऐकावे

होवुन कारंजे उसळे मन माझे
पाऊल का अजुनही ना तुझे वाजे
जीव माझ व्याकुळला दे आत हाक मला
ये ना!!!!!!!!!!!!!!!!!!

मोहरत्या स्वप्नांना घेवुन ये तु
थरथरत्या स्पर्शांना घेवुन ये तु
अनुरागी रसरंगी होवुन ये तु
नाजुकशी एक परी होवुन ये तु

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top