बसलो होतो एकांतात आली तुझी आठवण,
अजून एका कवितेची झाली मनात साठवण.
 

हरवून गेलो मी ही, हरपले सारे भान,
आता बरीच खोल झाली माझ्या कवितेची खाण.
 का गेलीस तू मला एकटे इथेच सांडून,
आजपर्यंत वाट पाहतोय बसलोय खेळ मांडून.

मनात तू असलीस तरी का आहे दुरावा,
पाणी होऊन डोळ्यात तो असा का उरावा.
 पाऊस पडला कि वाटत मनापासून भिजावं,
तुझ माझं गोड नात पुन्हा एकदा रुजावं.
 तू बोलत असतेस तेव्हा मन वेड्या सारख पळत,
अन निघून गेल्यावर मात्र वणव्या सारख जळत.

तुझ्या माझ्या प्रेमाची भिंत आहे पडलेली,
त्यातच तर खरी आहे आशा नवी दडलेली.

तुझी माझी प्रीत ती माहित आहे ढगाला,
माझं तुझ्यावर प्रेम आहे ओरडून सांगेन जगाला.

तू झालीस दुसरयाची ते मी आहे जाणतो,
तरी तुझ्या आठवणींचे अश्रू डोळ्यात आणतो.

कधी काय कळलेच नाही झालो तुझ्यात मग्न,
सांगायचे तुला राहूनच गेले अन झाले तुझे लग्न.

साभार - कवी: विशाल गावडे.

टिप्पणी पोस्ट करा Blogger

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top