साथीला आता तु नाहीस,
हे ह्रदयाला कसं समजावु,
अविरत पाझरणार्‍या डोळ्यांना,
तु नसण्याचं शल्य कसं दाखवु.....

तुझ्या पासुन दुर होण,
 माझ कोणतही पथ्य नाही....
कारण फक्त एकच की, पुन्हा एकदा प्रेमात पडुन
 विरह सहन करण आता मला शक्य नाही....।।

प्रत्येक वेळी भेटीच वचन मीच मागायचं का
पहा कधीतरी स्वताहून देता आल तर...
पाखर सुद्धा भेटतात परस्परांच्या ओढीन
बघ त्यांच्या कडून काही घेता आल तर ...

मनाला बांध घातला होता
हृदयातला पूर थोपवला होता..
पण डोळ्यांनी चुगली केली होती
अन आसवांनी दगा दिला होता..

नज़र ना लागो मला कुणाची
म्हणून तू माझी नजर काढून गेली .........
आठवणीत राहावे हे प्रेमळ क्षण
म्हणून तू गालावर माझिया काळजाचे बोट लावून गेली 
 
अज़ून तरी मी तुला
काही निरुत्तर केले नाही....
तरीपण माझ्या प्रश्नाना  
तू कधि उत्तर दिले नाही....

कधि तू कधि मी
एकमेकांशी
भांडू ....
राग ओसरल्यावर मात्र
पुन्हा प्रेमाचा नवा
डाव मांडू.....

जर तुला मला आजमवायच होत
तर फक्त तुज्या गाहिर्‍या
डोळ्यांनी पाहायच होत....
अग मी तर असाच बेशुद्धा झालो असतो
त्यात
एवढ का लोभस हसायच होत....


मी डोळे बंद करताच
तुजी आठवण तुला सोबत घेऊन येत होते.....
उघडतच डोळे निघून जातेस
म्हणून मी कायमचे डोळे मिटले होते....

आजकाल कोणाशी जास्त पटत नाही..
बोललेल कोणाला आवडत नाही..
जवळ असले
लेच मग दूर होताना..
क्षणाचाही विचार करत नाही..

बोटांना माझ्या आता
वेगळं राहायला आवडत नाही ..
तुझ्या बोटात गुंतल्या शिवाय
त्यांना ही करमत नाही ....



 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top