एकदा पोलिस स्टेशन मधे फ़ोन येतो, " हेल्लो एक emergency आहे लवकर या"
पोलिस : कोण तुम्ही ? काय झाले ?
फ़ोन वरुन आवाज येतो , " अहो घरात मांजर शिरलय"
पोलिस (चिडून) : मांजर शिरलय ही emergency होऊ शकते का?
फ़ोन वरुन आवाज येतो, " मी पोपट बोलतोय , घरात मी एकटाच आहे"

-----------------------------------------------------------------

गोटया : आई, परी आकाशात उडू शकते?
आई : हो
गोटया : मग आपली रखमा (कामवाली)
... का नाही उडत?
आई : ती परी नाही आहे.
गोटया : पण बाबा
तर तीला तू नसताना परी म्हणतात.
आई : काय????? मग
आता बघच, उद्या सकाळीच उडून जाईल....

-----------------------------------------------------------------

ट्रॅफिक पोलिसांनी कार थांबवली. 'अभिनंदन, रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू
आहे... तुम्ही सीटबेल्ट लावून गाडी चालवत आहात, म्हणून तुम्हाला ५०००
रु.चं बक्षिस मिळतंय.
या रकमेचं तुम्ही काय कराल?'
कार ड्रायव्हर: मी त्यातून माझं ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घेईन.
ड्रायव्हरची आई (मागच्या सीटवरून): त्याचं काही एक ऐकू नका.. दारू पिऊन
तो काय वाट्टेल ते बोलतो...
ड्रायव्हरचे बाबा: मला वाटलंच होतं... चोरीच्या गाडीतून आपण जास्त लांब
जाऊ शकणार नाही...
तेवढ्यात डिकीतून आवाज आला: भाई, आपण बॉर्डर पार केली का???

-----------------------------------------------------------------

गणपती बाप्पा: बाबा, बाबा, please मला कडेवर घ्या ना!
श्री शंकर : गपे, नाग चावेल!!!

-----------------------------------------------------------------

हवालदार : बाई, तुमची कमाल आहे. न घाबरता तुम्ही त्या चोराच्या मुस्कटात
मारलीत.!!!!!........
बाई : तो चोर आहे, हे मला नंतर कळ्लं, मला वाटलं आमचे हेच आहेत..

-----------------------------------------------------------------

८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता, मी माझ्या ऑफिसचा
फोन वापरतो मग एवढं बिल कस? बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते. मी
कशाला घराचा फोन वापरू. मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय. मी कशाला
घराचा फोन वापरू. कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो, मग
एवढं बिल कस?

-----------------------------------------------------------------

 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

Top