आत्ता दररोजची सवयही मोडायला हवी ना.
मला काही मागायच आहे तुझ्याकडे...देशील ना?

असं चमकून नको बघूस माझ्याकडे......!
मी असाच आहे सटीक, निष्ठुर म्हण हवं तर...
नेहेमी म्हणतेस तशी......!
पण आज जाता जाता सरते शेवटी हिशोब पूर्ण व्हायलाच हवा.
म्हणूनच विचारतोय...देशील ना?

तुझं हेच निरागस हसू दे...
समुद्रावरचा तो गार वारा दे...
धूंवाधार कोसळणारा पाऊस दे...
ती सगळी मूक् वचनं दे...
बोलून बोलून न थकणारी ती रात्र दे...
त्यातली ती आगतीक आसक्ती दे...
तुझ्या मिठीतली न संपणारी ती तृप्ती दे...
अन् सदैव दरवळणारी तुझ्या ओंजळीतली रातराणी दे...
तुझ्या आणि माझ्या खिडकीतला एकमेव चंद्र दे...
त्याच्या साक्षीने घेतलेल्या त्या पवित्र शपथा ही दे...
कधीही न बोललेली आनामिक भीती दे...
अन् तुझ्या एक भेटीसाठी होणारी जीवाची तडफड ही दे...

अं.........ह......काही बोलू नकोस.....अजुन खूप आहे.
थकलीस एवढ्यातच? एवढ्यातच डोळे पाणावले...?

जाऊ दे, फार काही मागत नाही तुझ्याकडे...
येवढंच कर….......!
माझ्यासाठी चूकलेला तुझा एक हृदयाचा ठोका दे...


 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
Submitted By: रुपाली 

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top