कुणीतरी म्हणाले....
ते काही इतकं सोपं नसतं.......
कविता करायला आधी
प्रेमात पडावं लागतं
एकदा प्रेमात पडलं की
बरोबर सगळं सुचतं जातं

कुणीतरी म्हणाले...
तेही इतकं सोपं नसतं
प्रेमात पडायला आधी
स्वतःला विसरावं लागतं
स्वतःला विसरुन जाताना
आठवणीचं माहोल जमु लागतं

कुणीतरी म्हणाले..
स्वतःला विसरायला आधी
कुणीतरी आठवावं लागतं
कुणाला तरी आठवायला
थोडस दुर जावं लागतं

कुणीतरी म्हणाले..
दुर जाण्यासाठी आधी
खुप जवळ यावं लागतं
खुप जवळ येण्यासाठी
विश्वासाचा नातं असावं लागतं

कुणीतरी म्हणाले..
विश्वासाचं नातं असण्यासाठी
मनाशी मन जुळावं लागतं
मनाशी मन जुळताना
जुळवुन घेणं शिकावं लागतं

कुणीतरी म्हणाले..
जुळवुन घेणं शिकण्यासाठी
स्वतःला तटस्थपणे पारखावं लागतं
स्वतःला पारखण्यासाठी
कवी व्हावं लागतं

कुणीतरी म्हणाले..
कवी होण्यासाठी आधी
आतुन काव्य स्फुटावं लागतं
आतुन काव्य स्फुटल्यावरच
कविता करावंसं वाटतं

कुणातरी म्हणाले....
तेही इतकं सोपं नसत

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top