* गरज ही शोधांची जननी आहे तर आळस ही सावत्र आई..

* झाडावर प्रेम करा. झाडाखाली नको..

* संवादान जग जिंकताही येत आणि सर्वस्व गमावताही…

* कोणतीही गोष्ट उचलण्यापेक्षा ढकलण सोपं असत. जबाबदारीच्या बाबतीत मी तेच करतो.

* नवरा नावाच बंदर असतं बायको नावाच्या डोंबा-यासाठी…

* संवाद हे अतिशय प्रभावी माध्यम आहे पण मौन त्याहूनही प्रभावी..

* तुम्ही दारु पिता का? हा प्रश्न आहे की आमंत्रण…

* लिंबाचा वापर दोन गोष्टींसाठी. उतरुन टाकायला आणि उतरवायला…

* दुस-यांचे फ़क्त दुर्गुण दिसण हा ही एक दुर्गुणच..

* तुमच्या ऑफ़िसमध्ये जोर कमी आणि बैठका जास्त अस होतय का?

* अजिबात झोप लागत नाहीये. अशी स्वप्न पडतात हल्ली..

* गार पाण्याचे पहिले दोन तांबे घेववत नाही. एकदम तिसराच घेतला तर..

* मला इतरांना मदत करायची आवड आहे पण सवडच मिळत नाही…

* आपण किती शुद्ध आहोत याचा अंदाज येईल…
हिमालयात जा किंवा सरकारी कार्यालयात….

* माणसाला रोजचे सुख नको असते॥ रोज नविन सुख हवे असते…

* दारु पिऊन गाडी चालवायला बंदी आहे ना?
मग बार बाहेर पार्किंग ची सोय कशाला?

* चूक नेहमी अचूकपणे करावी..

* जंतूनाशक इंजेक्शन नेहमी निर्जंतूक करुन का घ्यावे लागते…

* मोहाचा सामना करण्याचा एकच मार्ग.. त्याच्या मोहात पडण…

* फ़ॅशन म्हणजे असा कंटाळवाणा प्रकार . जो दर सहा महिन्यांनी बदलावा लागतो..

* काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं चांगल..

* स्वतःपेक्षा दुस-याच्या सुखावरुन प्रत्येकजण आपल दुःख ठरवतो..

* आयुष्य हे नदी सारखच आहे.. वहाण थांबल की डबकचं…

* पॉझीटीव्ह विचार केल्याने खरचं उपयोग होतो….

* दुचाकीची मळलेली मागची सीट म्हणजे स्वच्छ चारित्र्याच लक्षण…

*एक किलो सोन्याचे बक्षीस लागेल त्याची, चांदीच ना!!

*आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. आरोप करणार्‍यांना “खपवले” जाईल.

*आयुष्यात चार माणसे तरी जोडावित…..शेवटी उपयोगी पडतात.

*मांजर आणि नवरा कुठेही नेयुन सोडला, तरी संध्याकाळी घरीच परत येतो…..

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top