प्रेम कधी असतं, तेच कळत नाही..
प्रेम कधी नसतं, तेही कळत नाही..!!

फ़ार बरं झालं असतं,
जर मनालाचं, बोलता आलं असतं,
अगर ओठांनी शब्दांना,
कधीच अडवलं नसतं,
मग मन माझं,
मोकळं होऊन बोललं असतं,
अन सुत तुझं-माझं,
एकदाचं जुळलं असतं !!

पण, प्रेम कधी असतं, तेच कळत नाही..
प्रेम कधी नसतं, तेही कळत नाही..!!

सगळेचं सांगतात मला,
एकदा डोळ्यांत बघ तिच्या,
म्हणे डोळ्यांत प्रेम दिसतं,
पण यांना कुणी सांगाव,
तु समोर आल्यावर,
डोळ्यांत तुझ्या पाहण्याचं,
धॆर्यच माझ्या...डोळ्यांत नसतं !!

डोळ्यांत पाहिलही असतं ग मी,
पण काय सांगाव ..
डोळ्यांत, प्रेम नसलचं तर
अन असुनही,
जर मला ते नाही दिसलं तरं ?

कारण, प्रेम कधी असतं, तेच कळत नाही..
प्रेम कधी नसतं, तेही कळत नाही..!!!! 

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top