काळ्या कुट्ट आकाशात
चांदण्याचा सडा पडला होता..
माझ्या सोबत चालताना
तुला तो नक्षत्राचा तारा आवडला होता..

मनात आलं माझ्या..
अन वाटल की
तु म्हणावस मला..
तो तारा घेवून ये माझ्या राजा..

कदाचित माझ्या मनातलं
तुला अचुक कळत होतं..
तुझ न माझ प्रेम ..
किती तंतोतंत जुळत होत..

तु हसून म्हणालीस
घेवून येशील का रे ते तारे..
मी म्हणालो कठीण आहे पण
प्रयत्नाचे घालीन वारे..

तुझ्यासाठी वेडा झालो,
चांदण्याशी संवाद करायला निघालो
तु मात्र मला हसत होती
काय चाललय तुझ म्हणून विचारत होती..

मी विचारले चांदण्याना
माझ्या साजनीच्या केसात
सडा पडेल का तुमचा..

त्या म्हणाल्या का नाही?
पण एक अट आहे..
मी म्हणालो माझ्या साजनी साठी
मरणासमोर सुध्दा माझी मान ताठ आहे..

आम्हाला तु हवाय ..
येशील का?
तुझ्या साजनीला विचार ..
आमच्या प्रेमाला ह्याच्यासारख जपशील का..

तेवढ्यात माझी साजनीच्या
डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या
त्या आवरताना माझ्या पापण्यांच्याही
कडा ओलसर होऊ लागल्या

मला काही नको
तारा नको चांदण्या नको
मला फक्त तु पाहिजे..
माझ्या जगण्याला तुझा श्वास पाहीजे.. 

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top