आयुष्य म्हणजे नेमक काय याचा विचार केला तर जाणवत की, लॉटरीच तीकीटच की..! गावी शेजारी एक अशिक्षित आजोबा राहतात. आजोबा प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला १ रुपयाचं लॉटरीच तिकीट विकत घेतात. बक्षिसाची रक्कम असते १५ लाख रुपये. दर महिन्याच्या १५ तारखेला लॉटरीच्या... टपरी वर जाऊन लॉटरी लागली का ते पाहतात. लॉटरी लागली नाही तरी येताना पुन्हा १ रुपयाचं तिकीट घेऊन येतात. आजपर्यंत १० वर्ष झाली. पण एकदाही आजोबाना लॉटरी लागली नाहीये.
एकदा न राहवून मी विचारलं "आजोबा...कशाला खर्च करता लॉटरीवर...! इतक्या वर्षात एकदाही लागली नाहीये....!" आजोबा मंद हसले...आणि म्हणाले .."बाळा..लॉटरी लागावी म्हणून मी तिकीट नाही कधी काढत..१ तारखेला लॉटरीच तिकीट काढला की १५ तारखेपर्यंत मी मला १५ लाख मिळाले तर काय काय करेन याची स्वप्न पाहतो. १५ तारखेला लॉटरी लागली नसली की पुन्हा १ रुपयाचं तिकीट काढतो..आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत स्वप्न पाहतो...! असा २ रुपयात माझा प्रत्येक महिना छान जातो...! बाळे ही स्वप्नच मला जगायची उमेद देतात......!" " स्वप्नात मी आज्जी बरोबर सगळे देश फिरून येतो...रोज सकाळी लंडन मधे तर रात्री पॅरीसच्या टॉवर वर आम्ही कॉफी घेतो...जिवंतपणी आजीला कधी मुंबईला पण नेऊ शकलो नाही..पण आता मात्र तिला सगळीकेडे नेतो...तिला हवा ते घेऊन देतो...कालच मला म्हणाली की जीन्स ची पॅंट आणून द्या...! " "दुसर्याना त्रास न देता मनातल्या मनात स्वप्न बघितली तर काय वाईट ...? "
मी म्हणाले..."आजोबा पण स्वप्न मोडली की त्रास नाही का होत...?"
आजोबा म्हणाले.."अगो..मग लॉटरी लागेपर्यंत वाट पाहायची आणि वाट पाहण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून नवीन स्वप्न बघायची...२ रुपयात..महिना छान घालवायचा..."
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook