आतापर्यंत मन माझे ग्रुपकडुन ज्या मदत योजना राबवण्यात आल्या, तुम्ही सर्वांनी त्या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे शतशः ऋणी आहोत. 🙂🙏🏻💐

🇮🇳  यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही राम कृष्ण हरी वृद्धाश्रम मदत योजना हाती घ्यायचे ठरवले आहे. आश्रमातील वृद्ध लोकांचे एकटेपण दूर करणे, त्यांना आवश्यक आधार देणे, येणार्‍या काळात उभ्या ठाकणार्‍या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांना समर्थ करणे ह्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.. म्हणून आम्ही एक छोटस पाउल उचललेल आहे ..त्याला तुम्हा सर्वांचा योग्य प्रतिसाद लाभेल अशी आम्ही आशा करतो !!
 
२६ जानेवारी रोजी बदलापूर येथील राम कृष्ण हरी वृद्धाश्रमाला आपण भेट देणार आहोत. आपण या ठिकाणी अन्नदान, किराणा सामान, भेट वस्तू आणि देणगी द्यायचे ठरविले आहे.

राम कृष्ण हरी  वृद्धाश्रम मध्ये अंदाजे ३५ वृद्ध आहेत आणि या उपक्रमासाठी लागणारी मदतीची यादी पुढील प्रमाणे आहे :

किराणा सामान:

तांदूळ  - २० किलो
तूरडाळ - १० किलो
चहा पत्ती - ५ किलो
साखर - १० किलो
रवा - ५ किलो
पोहे - ५ किलो
तेल - १५ लिटर
गव्हाचे पीठ -  १० किलो
छोले  - २ किलो
मूगडाळ - २ किलो
चणे - २ किलो
गरम मसाला - २ किलो
लाल मिरची पावडर - २ किलो
हिरवे वाटणे- २ किलो  
साबुदाणा - २ किलो
शेंगदाणा - १ किलो
मटकी - २ किलो
चवळी - २ किलो
अख्खा मसूर - २ किलो
बेसन पीठ - २ किलो
गूळ - २ किलो



एक दिवसाचे अन्नदान - ३००० ₹

मदतीची यादी पुढील प्रमाणे आहे, त्यामधील जेवढा वाटा आपण उचलू शकता तितका
मोलाचा ठरेल. ज्यांना मदत करावयाची आहे त्यांनी 9869257808 नंबर वर Gpay/Paytm द्वारे मदत पाठवू शकता.
आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत. 🙏🏻

नोंद : जे इव्हेंट ला येणार आहेत त्यांनी शक्य असल्यास सफेद,भगवी किंवा हिरवी वस्त्रे तिरंग्याच्या सन्मानार्थ परिधान करावी

आभार
मन माझे 💐

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top