मकर संक्रांत हा सण जरी उत्साहाने साजरा केला जात असला तरी; ह्या सणाला एक दु:खाची तसेच काळी झालर आहे. आपल्या समाजाने संकटाच्या सुरवातीस संक्रात येणे असे संबोधू लागले. कित्येक लोक त्यादिवशी काळे वस्त्र परिधान करुन साजरा करतात.

तसे तर ह्या काळ्या वस्त्रास परिधान करण्याकरिता तसे दोन मत प्रवाह असु शकतात. एक भौगोलिक तर दुसरे अंधश्रध्देचे.

भौगोलिक कारण म्हणजे सुर्याचा उत्तरेकडे प्रवास. ह्या उत्तरायणा मुळे हिवाळा कमी होउन थंडी कमी होते. दिवस मोठा तर रात्र छोटी होत जाते. पण ह्या दिवसात थंडी पासुन बचाव करण्याकरीता काळे कपडे वापरले जातात कारण काळा रंग उष्णता खेचुन घेते अन ती राखुन ही ठेवतात.

तसे हे रास्तही वाटते कारण ह्या दिवशी तीळ, गुळ वाटुनही साजरा केला जातो. तीळ आणि गुळ ह्या पदार्थामुळे उष्णता मिळुन थंडी पासुन संरक्षण होते. त्याच प्रमाणे काळे कपडे ह्यादिवसात असणाऱ्या थंडी पासुन रक्षण करण्याकरीताच वापरत असावेत असे वाटते.

थंडी पासुन संरक्षण करणे हे भौगोलिक कारण असले तरी अजुन एक समज प्रवाहात आहे तो म्हणजे अंधश्रध्देचा. कदाचित १७६१ मध्ये संक्रातीच्या दिवशी पानिपतच्या लढाईत झालेल्या मराठ्यांच्या पराभवामुळे तसेच झालेल्या अपरिमित मनुष्य हानी मुळे मकरसंक्रातीचा दिवस काळे वस्त्र परिधान करुन साजरा करत असु. ह्या दिवशी एका मराठी पिढीचे नष्ट होण्याचे संकट ओढवल्यामुळे मकरसंक्रातीस संकट ओढावणे असे म्हणत असतील अशी शक्यता वाटते !

संकलन :- अशोककाका कुलकर्णी


टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top