#मी तो....... खरं तर असाच टाईमपास म्हणून केलेला तो call आताशा माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला होता. बस स्टॉपवर मी तीला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं खरचं निरागस होती ती.. अगदी सोज्वळ.. ना कुठली फॅशन  ना कोणता मेकअप.. अगदी ओरिजनल.. 

तीच्या डोळ्यात माझ्या बद्दल अतोनात आदर अन् तिचं तीला ही अजून न कळलेल माझ्यावरील प्रेम स्पष्ट दिसतं होत मला.. अगदी दिवस रात्र मुलींच्या घोळक्यात राहणारा एका नजरेत मुलींना ओळखणारा मी..पण ही त्यासाऱ्या खुप वेगळी होती . तिच्या मध्ये माणसं जोडून ठेवायची ताकद होती. अगदी माझ्या सारख्या वाऱ्या च्या वेगावर स्वार होणाऱ्या व्यक्ती ला लगाम घातला होता तीने....

खरचं तीच्या डोळ्यात पाहिलेल् स्वप्न मी पुर्ण करू शकेन का? 

तीला भेटून आल्यापासून हा एकच प्रश्न माझ्या डोक्यात घुमत होता?

मनात एक निर्णय पक्का झाला होता..

नेक्स्ट डे "ये miss call आजपासुन मी खुप बिझी असेन. कॉल Msg करायला जमणार नाही. काळजी घे असा टेक्स्ट msg sent झाला..

त्यावर बर असा तिचा reply आला.. 

मनात प्रचंड खळबळ माजली होती.. काही तरी दुर निसटून जात आहे याची जाणीव,, आजपर्यंत अगदी भावनारहित वागणारा मी आज पहिल्यांदा प्रचंड अस्वस्थ झालो होतो.. इतकी कधी, कशी सवयीची झाली ती माझ मला ही कळलं नाही.

पण तेचं योग्य होत तिच्या साठी .. 

दोन वर्षांपूर्वी हुशार असुन शिकण्याची आवड असूनही अर्धवट शिक्षण सोडून  कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई सारख्या महानगरात आलेली ती.. स्वतः ला अगदी strong बनवून ठेवलं होत तिने. खुप सारी स्वप्न अर्धवट सोडून आपली कर्तव्य पार पाडत होती ती...इतकं मोठं स्वप्न पुर्ण नाही झाल  तर सहन करू शकेल का ती? माहित नाही या क्षणी डोक्यात नक्की काय चालु होत. तीची काळजी की हरण्याच्या भीतीने आधीच घेतलेली माघार ! 

#मी_ती... 

सकाळी सकाळी त्याचा  " ये miss call आजपासुन मी खुप बिझी असेन.... असा टेक्स्ट मेसेज show झाला..

काही तरी चालु आहे तिकडे याचा अंदाज आला होता मला.. म्हटल चला त्याचा त्याला वेळ देऊ . तसा तो वरकरणी खुप कठोर वागणारा आतून तितकाच प्रेमळ होता हे जाणल होत मी.. मी माझं माझं त्याला दिवसभर लिहीत होते... माझ्या २० पैकी ५ msg चे रिप्लाय येतं होते.. 

दोन चार दिवस असेच गेले.... पाचव्या दिवशी " भेटूया या आपणं पणं निवांत वेळ काढून अस ठरल..१४ मार्च ला दुसरी भेट ठरली... एका प्रसिध्द देवी च्या मंदिरात.. 

आजही सकाळी निघताना मी त्याचा मोबाइल नंबर माझ्या बेस्ट फ्रेंड कडे ठेऊन आली होती.... मला काही झाल तर याला पकड ग असा msg ही ठेवला होता तिच्याकडे..(नंतर त्याला सांगितल्यावर खुप मार खाल्ला होता मी.. इतका अविश्वास 🙄🙄🥺😱🥱🤭 असं म्हणत गोड शीक्षा मिळाली होती 😂😂)अगदी वेळेचा पक्का तो अगदी एक मिनिट ही पुढे पाठी न होणारा. माझी मात्र त्याची वेळ कॅच करता करता तारांबळ उडाली होती.  ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास late झालं होत मला.. तो return नाही गेला मग मिळवल इतकीच प्रार्थना चालु होती बाप्पा कडे.. पोचल्यावर त्याचा एक शांत पण कडक लूक .. माझी चुक असेल तर मी कधीच कोणाकडे हुज्जत घालत नाही त्यामुळे कारण देण्याचा प्रश्नच नव्हता. चल बस इतकंच खुणेने त्याच सांगणं अन् माझं निमूटपणे ऐकणे... आज स्वारी काही तरी वेगळाच नुर घेऊन आली होती.. इतका बडबडा तो पूर्ण प्रवासात अगदी शांत होता. आधी वाटलं मला late झालंय म्हणून कदाचित असा आहे पण खरं तरं तस नव्हतच.. 

अगदी दर्शन वगैरे घेऊन झाल्यावर, मला बोलायचं आहे तुझ्या कडे चल तिकडे बसु.. अगदी शांत निवांत जागा निवडून बसलो होतो आम्ही.. खुप वेळ तो शांतच होता. सुरुवात कुठुन करावी याच्या विचारात तो असताना, मी हळुच त्याचा हात हातात घेऊन  त्या हातावर हलकेच थोपवत डोळ्यांनीच बोल असा इशारा केला...

अगदी दुसऱ्या क्षणाला त्याची हातावरची पकड घट्ट झाली.. " ये miss call तु पाहिजे यार मला अगदी माझ्या आयुष्याच्या शेवट पर्यंत.. असं म्हणत रडणारा तो.. अन् त्याच हे रूपडं पाहून भयंकर गोंधळलेली मी.. आतापर्यंत फक्त मी त्याचा राग, शिस्त, बचपना, पाहिला होता पण खरं तर आज पहिल्यांदा तो मला खरा कळत होता... सुरुवात झाली होती त्याची त्याच आयुष्य सांगायची.. खूप कष्ट करून त्याने हे नाव कमवल होत..तो जरी forward असला तरी त्याचे घरचे मात्र होते तिथेच होते.  अन् हीच त्याची सगळ्यात कमकुवत बाजु .  घरच्यांना डावलून तो काहिही करणार नव्हता.. त्याची आई म्हणजे त्याच्या साठी देव होती...अन् तीचा शब्द अंतिम होता त्याच्या साठी. त्यासाठी तो स्वतः च आयुष्य ही पणाला लावू शकत होता...अन् लावलं ही होत त्याने.. त्यामुळे असं खोट्या आशेवर कोणाला गुंतवून ठेवण्याचा अधिकार मला नाही असं म्हणत रडणारा तो...." जो पर्यंत तुला पाहिजे तोपर्यंत मी कायम तुझ्या सोबत असेन अस म्हणत माझा त्याला सावरण्याचा प्रयत्न..... 

#मी_तो.. आज पहिल्यांदा एरिया मधील बाप्पा, घरातील आई नंतर कोणासमोर तरी नतमस्तक झालो होतो मी. खुप strongly सावरलं होत तिने मला.माझा विश्वास खरा ठरला होता,,. कोणत्याही मुली वर काडीचा ही विश्र्वास न ठेवणारा मी.. हिने मला प्यूअर मैत्री म्हणजे काय असत शिकवलं होत . पुरुषाच्या यशा मागे एक कणखर स्त्री चा महत्वाचा वाटा असतो अन् माझ्या साठी ती स्त्री म्हणजे ती होती. माझी miss call ❤️❤️ आता बारी माझी होती तीच आयुष्य सावरायची.. तीला तिची अशी स्वतः ची ओळख बनवून द्यायची...❤️❤️

त्यानंतर खुप वेळ चाललेलं त्यांचं त्यांच्याच आयुष्यावरील डिस्कशन , नशिबात असेल तर आयुष्यभर सोबत राहू अन् नसेल तर जोपर्यंत सोबत राहु त्याला आयुष्य बनवू.. पण आपल नशीब आपणच घडवू असं काहीसं ठरवून नव्या अध्यायाची सुरुवात केली होती त्यांनी..🙏❤️🥰

क्रमशः.

साभार - लेखिका: राजेश्वरी शिगवण

Post a Comment Blogger

 
Top