संक्रांत निमित्त सुवासिनी बायकांसाठी उत्सवाची पर्वणी म्हणजेच हळदीकुंकू. या हळदीकुंकवाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकवाची देवाण-घेवाण करतात एकमेकींसोबत हे वान लुटले जाते .  यामध्येच एक संक्रांत झाल्यानंतर कुंतीचे वाण दिले जाते.

कुंतीचे वाण असे आहे :-

पूर्वापारपासून चालत आलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रथा - परंपरा आहेत . आपल्याला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांनी खूप मोठा त्याग केला असल्याचा आपल्याला दिसून येतो.पुरातन काळापासूनच पती परमेश्वर मानला जातो आणि त्यांनाच उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभण्यासाठी अनेक प्रकारचे व्रतही केले जातात. असेच संक्रातीच्या पर्व काळामध्ये कुंतीचे वाण देण्याची प्रथा आहे. या वानांमध्ये सर्व सौभाग्य अलंकार व इतरही असतात. नाना प्रकारची फळे देखील यामध्ये असतात. हे वाण एका सवाष्णीने दुसऱ्या पाच सुवासिनींना वाटल्यास तिचे सौभाग्य अबाधित राहते. जन्मात येऊन एकदा तरी हे वाण द्यावे  लागते असे म्हणतात. हे वान आपल्याला दुसऱ्या कडून मिळत असते .त्यामुळे आपणही तीच परंपरा पुढे चालवत पुढच्या वर्षी येणाऱ्या संक्रातीला खना सोबत या वाणाची ही पूजा करून ते इतर पाच जणींना द्यावे लागते . एक वान देवाला किंवा तुळशीला अर्पण करून दिले  जाते , एक वान ज्याने आपल्याला दिलेले आहे, त्याचे त्याला परत दिले जाते , आणि उर्वरित तीन किंवा दोन वाण सुवासिनींना वाटले जाते . हे वान आपल्याच घरातील जाऊ किंवा सासुबाई यांनाही दिले तरी चालते . परंतु दोन वान हे आपल्या दूरवर असलेल्या नातेवाइकांना किंवा आप्तेष्टांना दिले पाहिजे . जेणेकरून तिथूनही ती साखळी लांबली जाते . ही साखळी अशीच अखंड चालू असते . ज्या पाच जणीना वाण दिले जाते , त्या पुढच्या वर्षी दुसऱ्या पाच जणींना हे वान देत असतात. खरंतर वाण म्हटलं की उत्साहवर्धक वातावरण असत. आता कुंती चे वान म्हटले तर साग्रसंगीन , त्या वाणाची पूजा करून संक्रांतीच्या दिवशी खनासोबत ठेवले जाते , यामध्ये सव्वा किलो हळद, सव्वा किलो कुंकू, सव्वा किलो तीळ आणि सव्वा किलो गूळ, तसेच लाल सुपारी, खारीक, खोबरं, बदाम, नारळ , ओटी चे सर्व सामान, किंवा नवीन वस्त्र, लाल रंगाची साडी, पितळेची निरंजनी, फुल वात , हळदी कुंकवाचे पंचपाळे ,पायात घालण्याचे जोडवे , काळ्या मण्याची सर , काचेच्या हिरव्या बांगड्या, ई. सौंदर्यप्रसाधनांमध्ये सर्व साहित्य आरसा, कंगवा जसे की मेहंदी,अजूनही साहित्य. प्रांता प्रमाणे प्रत्येकाची देण्याची प्रथा वेगवेगळी आहे. पूर्वीच्या काळात महाराणी गांधारीने हे वाण महाराज पांडू यांची भार्या राजमाता कुंतीला दिले होते. त्यावेळेस कुंती ही महाराज पांडू सोबत वनात रहात होती. गांधारी ज्यावेळी तिकडे गेली, त्यावेळेस तिने तिची असलेली प्रचंड महासेना, पायदळ, घोडदळ, तसेच मोठा अवाढव्य असा सैन्यफाटा आपल्या श्रीमंतीची प्रदर्शन करत सौभाग्याचे हे वाण कुंतीकडे घेऊन गेली होती.गुळाचे प्रकार, तिळगुळाचे नानाविध मिष्ठान्न, हिरे, जवाहर, रत्न माणिक मोती, नवीन वस्त्रे असे अनेक

उपहार घेऊन वनात आली. प्रचंड लवाजमा घेऊन हे वाण तिने कुंती ला दिले. थोडेसे का होईना गांधारीच्या मनात किल्मिष आले होते. माझ्यासारखी कुणीच हे वान देऊ शकणार नाही . आज मी देते आहे, उद्या माझे सव्वा पटीने करून माझी मला परत दे" असे म्हणून त्यांनी सौभाग्य चे वाण लुटले.

पुढे संक्रातीचा पवित्र पर्व आल्यानंतर कुंतीलाही प्रश्न पडला की मी हे वाण कसे परत करणार ? माझ्याकडे तर कोणतेही दल, सेना किंवा इतर कोणतेही साधन नाही. ना हत्ती , ना घोडे, ना पालखी,सोहळे.याच विवंचनेत असताना कुंती दुःखात राहू लागली. सतत विचार करू लागली. भीम आणि अर्जुनाला प्रश्न पडला.त्यांनी इंद्राकडून

इंद्राचा ऐरावत नावाचा हत्ती धरतीवर आणला. आणि या हत्तीवर बसून राजमाता कुंती ने गांधारीला वाण परत दिले. तेव्हा कुंतीने सांगितले की हा भाग्याचा अलंकार आहे. हे दिल्या घेतल्याने सौभाग्य वाढते. पण यामध्ये ही स्पर्धा आणि परामर्श नको. हे सढळ हाताने आणि हसत मुखाने दिल्यावर घेतले जाते .अंतकरणातून हे करायला हवं. जनसामान्यानाही देता घेता यावं, यासाठी हे वान कुंतीचे वाण या नावाने ओळखलं जाऊ लागलं . आणि तिथूनच प्रथा सुरू झाली घेण्यासाठी व इतरांनाही देण्यासाठी. पहिल वाण दोघींनीही एकाच घरात दिल्यामुळे घरात वादही होतात .किंबहुना तेव्हा तर महायुद्ध होऊन महाभारत घडले आहे आणि हे असे होऊ नये . यासाठी हे वाण एकाच घरात दिले जात नाही , तर आपल्या आप्तेष्टांना जे आपल्याला नेहमी धरून चालतील अशांना दिले जाते .

संकलन :- अशोककाका कुलकर्णी


Post a Comment Blogger

 
Top