मकर संक्रांती पुजा साहित्य

पूजेसाठी ५ बोळकी (सुगड), २ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कपडा, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर व ताम्हन अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती घ्यावी.

पाच बोळक्यांना दोरा बांधावा, त्यांना हळद-कुंकू लावावे, त्यामध्ये उसाचे काप, तील-गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे. समोर निरांजन, अगरबत्ती लावावी. ह्याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य, कपडा लक्ता कशाची कमरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये. 

तिळाचे महत्व

संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. ह्या दिवशी महाराष्ट्रात तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ-गुळाची पोळी ह्याचा नेवेद्य बनवतात. घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते.

हळदी-कुंकू

मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेर कडून काळी चंद्रकळा, हळद-कुंकूचा कोयरी अथवा करंडा देवून तीळ-गुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात जावई बापूंना चांदीची वाटी तील-गुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे. संध्याकाळी महिलांना (सुवासीनीना) घरी हळदी-कुंकूला बोलवून त्यांना हळद-कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या, नारळ, आरसा, एखादी स्टीलची वस्तू, किंवा फळ वाण म्हणून दिले जाते.

तीळ-गुळ घ्या गोड गोड बोला

मकर संक्रांती ह्या दिवशी एकमेकांनच्या घरी जावून तिल-गुळ देवून आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणूनच ह्या दिवशी म्हणतात “तील-गुळ घ्या गोड बोला” तसेच एकमेकांना योग्य चांगली दिशा दाखवायची.

 मकरसंक्रांत दान महिमा

सूर्याच्या उत्तरायणाच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान आणि सूर्यदेव, नवग्रह आणि देवदेवतांची पूजा केल्यास इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक पुण्य मिळते, असे पुराण आणि धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे. असे मानले जाते की भगवान सूर्याने शनिदेवाला वरदान दिले आहे की वर्षातून एकदा तो मकर राशीत शनिदेवाच्या राशीत आल्यास तो शनिदेवाचे घर समृद्ध करेल. मकर राशीत आल्यावर शनिदेवाने सूर्यदेवाची तीळ आणि गुळाने पूजा केली. मकरसंक्रांतीच्या दिवशी शनिदेव आणि सूर्यदेवाच्या प्रसन्नतेच्या दिवशी लोकरीचे कपडे, कापूस, चादरी, वहाणा, धान्य, तीळ, गूळ आदी वस्तू गरजूंना दान कराव्यात, अशी परंपरा या वेळी सुरू आहे.

मकर संक्रांती पौराणीक कथा

या दिवशी सूर्य देव उत्तरायण होतो म्हणजेच उत्तर गोलार्धात येतो. धार्मिक दृष्टिकोनातून असे मानले जाते की या दिवसापासून देवलोक म्हणजेच स्वर्गाचा दिवस सुरू होतो. या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत असेही सांगितले आहे की, जे उत्तरायण आणि शुक्ल पक्षाच्या काळात शरीराचा त्याग करतात त्यांना पुन्हा देह धारण करून मृत्यूलोकात यावे लागत नाही, म्हणजेच त्यांना मुक्ती मिळते. या संदर्भात एक आख्यायिका आहे. या दिवशी भगवान विष्णूने पृथ्वीवरील असुरांचा पराभव करून त्यांच्यावर विजय मिळवला असे म्हटले जाते, तेव्हापासून भगवान विष्णूच्या या विजयावर मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. याशिवाय अनेक ठिकाणी पतंग उडवूनही हा सण साजरा केला जातो.

बोरन्हाण

संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण करायची महाराष्टात पद्धत आहे. ह्या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे. तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे, तील-गुळ, साखर फुटणे, बोर, चॉकलेट, मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात. सर्व लहान मुले गुण्यागोविंदाने ह्या मध्ये भाग घेतात.

कीक्रांत

संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी कीक्रांत असते. त्यादिवशी कोणतेही शुभ म्हणजे चांगले कोणते ही काम करू नये.हळदी कुंकू रथ सप्तमी पर्यंत करता येते.

संक्रांतीची वारनामें व गमनादि दिशा

वार - रवि

नावें - घोरा

आगमन - उत्तर

गमन - दक्षिण

दृष्टी - नैऋत्य

मुखदिशा - पूर्व


वार - सोम

नावें - ध्वांक्षी

आगमन - दक्षिण

गमन - उत्तर

दृष्टी - ईशान्य

मुखदिशा - पश्चिम


वार - मंगळ

नावें - महोदरी

आगमन - पूर्व

गमन - पश्चिम

दृष्टी - वायव्य

मुखदिशा - दक्षिण


वार - बुध

नावें - मंदाकिनी

आगमन - पूर्व

गमन - पश्चिम

दृष्टी - वायव्य

मुखदिशा - दक्षिण


वार - गुरु

नावें - नंदा

आगमन - पश्चिम

गमन - पूर्व

दृष्टी - आग्नेयी

मुखदिशा - उत्तर


वार - शुक्र

नावें - मिश्रा

आगमन - उत्तर

गमन - दक्षिण

दृष्टी - नैऋत्य

मुखदिशा - पूर्व


वार - शनि

नावें - राक्षसी

आगमन - दक्षिण

गमन - उत्तर

दृष्टी - ईशान्य

मुखदिशा - पश्चिम


नक्षत्रांवरून संक्रांतीचीं नावें


नावें - घोरा

नक्षत्रे - उग्रन ० , ३ पूर्वा , भरणी , मघा .


नावें - ध्वांक्षी

नक्षत्रे - क्षिप्रन ० , पुष्य , अश्विनी , अभिजित् , हस्त .


नावें - महोदरी

नक्षत्रे - चरन ० , स्वाती , श्रवण , धनिष्ठा , शतता ० , पुनर्वसु .


नावें - मंदाकिनी

नक्षत्रे - मैत्रन , मृग , चित्रा , अनुरा ० , रेवती .


नावें - नंदा

नक्षत्रे - स्थिरन , रोहिणी , ३ उत्तरा .


नावें - मिश्रा

नक्षत्रे - मिश्रन , विशाखा , कृत्तिका .


नावें - राक्षसी

नक्षत्रे - दारुणन ० , ज्येष्ठा , आर्द्रा , आश्लेषा , मूळ


संकलन :- अशोककाका कुलकर्णी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top