जवळ जवळ 10 वर्ष झाली ते दोघं वेगळे होऊन पणं असा एक ही दिवस नाही गेला की त्याची आठवण आली नाही.. तो होताच तसा infact आजही तो तसाच आहे . आजही आठवतो त्याचा पहिला कॉल.. 3मार्च 2008 वेळ रात्री 11:05 कोणता तरी unknown number mobile screen वर झळकत होता.. इतक्या रात्री कोणी केला असेल कॉल? घेऊ की नको या द्विधा मःस्थितीत ती, शेवटी धीर करून  तिने कॉल रिसिव्ह केला.. समोरून कोणी तरी हॅलो हॅलो करतं होत ती माञ आवाज ओळखीचा वाटतो आहे का ?याचा अंदाज घेत होती.. कदाचीत तो call cut करणार असं वाटलं तिला तितक्यात ती बोलली कोण पाहिजे? त्यावर त्याचा पहिलाच षटकार रात्री 11 ते 6 Idea वाल्यांनी free calling स्कीम चालु केली आहे मी रोज एक unknown number ट्राय करतो समोरच्याची इच्छा असेल तो बोलतो नसेल तो call ठेऊन देतो तुला बोलायच असेल तर बोलू शकते. 🧐🤔😱😂😀..जगात किती विचीत्र पात्र भरली आहेत असं बोलून call कट केला तीने .

नेक्स्ट डे Saturday night..  हक्काची सुट्टी. ती तिच्या मैत्रीणी सोबत बाहेर राऊंड मारत होती .

Same time same number Varun alela call...

मैत्रीणी च्या सांगण्यावरून रिसिव्ह झाला... 

सुरूवात तशी ओरडुन च झाली.. पण बंदा बोलण्यात एकदम एक्सपर्ट.. ये तु कोकणातली ना? तुझ्या आवाजाच्या tone वरून ओळखलं मी . मला आवडत कोकण! बस! संपलं होत ईथे सगळ. त्याची कानउघडणी करण्यासाठी केलेला कॉल जवळ जवळ एक तास चालला ते ही तिची कानउघडणी करून.. अर्थात टॉपिक होता कोकण... तो विदर्भाचा असुन कोकणच्या मातीची खडा न खडा माहिती असणारा तो. नक्की कोकणी कोण हा प्रश्न तिच्या हि नकळत तीला पडला नसता तरच नवल!

त्यानंतर आठ दिवस एक दिवस आड येणारा कॉल आता जवळ जवळ रोजचाच झाला.. दिवसभर त्याचा दुसरा permanent वाला नंबर चालु असायचा अन्  आयडिया नंबर बंद. अन् तिने ही कधी तो नंबर मागितला नाही..

त्यामुळे दिवसा कधी बोलणं व्हायचं च नाही. रोज ठरलेल्या वेळेत आयडिया वरून येणारा कॉल हे समीकरण च झालं होत.

दिवसभरातील बऱ्याच गोष्टी शेअर होऊ लागल्या. जर्नालिझम चं शिक्षण घेत असलेला तो.. प्रचंड बोलका स्वभाव.. ती ही तशीच अगदी open Book.. दोघांची बऱ्यापैकी मैत्री होत चालली होती... पण महीनाभराने अचानक call बंद झाला. बहुतेक night calling ची स्कीम संपली असावी.  तिने खुप दिवस बऱ्याच वेळा त्याचा कॉल ट्राय केला पण no. बंदच येत राहिला. नंतर नंतर तिने नाद सोडून दिला.. नीट निरोप ही न घेता एक  नात उमलण्या आधीच संपलं होत? त्याच असं न सांगता जाणं खरं तर खुप जिव्हारी लागलं होत तिच्या.. अधुन मधुन आठवायचा तो तिला पणं वेळ कोणासाठी थांबत नसते... ती ही वेळेबरोबर पुढे जात होती...


जवळ जवळ 5 महिन्याने तिचा वाढदिवस.. सकाळी भल्या पहाटे एका नवीन नंबर वरून छान सा वाढदिवसाचा msg.. ..

आजकल ती unknown number टाळत होती.. असेल कोणी तरी म्हणून इग्नोर करून दिवसाची सुरूवात झाली.. 

दुपारच्या सुमारास त्याच नंबर वरून call.. पहिला कॉल miss call.. जवळ जवळ 7 calls Miss मध्ये जमा करून 8 वा call receive केला तीने.. 

हो त्याचाच call होता, तोच होता तो...🤗 त्याच हॅलो ऐकून दोन क्षण ती स्तब्ध.. 

आयुष्यात आला कधी call त्याचा तर खुप सूनावयाच  असं tharaunch ठेवलं होत तिने.. पण माहित नाही आता या क्षणी तीच्या डोळयात अश्रू  जमा होउन ओघळू कधी लागले तिचं तीला ही कळलं नाही.. . कदाचीत समोर ही तीच परिस्थिती होती..  

जवळ जवळ दोन मिनट दोन्ही कडे भयाण शांतता..

"झालं रडून?" त्याचा शांतता भंग करणारा तीला प्रश्न..

Ofcourse  त्याला तीचा ओरडा, शिव्या खायच्या होत्या अन् त्या तयारीनिशीच त्याचा call...वाढदिवसाच अनोखं अन् सुंदर गिफ्ट बाप्पा ने दिलं होत तिला.....😍😍 पुढे काय वाढून ठेवलं होत ते त्या नियतीलाच माहित.

Miss call नावाने त्याच्या कडे तीचा नंबर save झाला होता.. अन् तिच्या कडे permanent.....

😘😘😘😘

सुरु होत होती एका नव्या पर्वाची नांदी.

क्रमशः..

साभार - लेखिका: राजेश्वरी शिगवण

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top