आजोबा आता तुमचा जमाना गेला...आता आमच्या नवीनम्हणी ऐका...आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी


-
१. साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा

२. ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी

३. एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण

४. लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी

५. चोर्‍या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला

६. आपले पक्षांतर, दुसर्‍याचा फुटीरपणा

७. प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे

८. अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा

९. जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण

१०. एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो

११. सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना

१२. वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला

१३. वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले

१४. घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे

१५. साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बरा होता

१६. गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता

१७. स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार

१८. मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका

१९. न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला

२०. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा

२१. पुढार्‍याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये

२२. नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही

२३. नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही

२४. घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा

२५. घरावर नाही कौल पण अ‍ॅंटीनाचा डौल

२६. घाईत घाई त्यात चष्मा नाही

२७. रिकामा माळी ढेकळ फोडी

२८. घरोघरी मॉडर्न पोरी

२९. ओठापेक्षा लिपस्टीक जड

३०. नाकापेक्षा चष्मा जड

३१. अपुर्‍या कपडयाला फॅशनचा आधार

३२. बायकोची धाव माहेरापर्यंत

३३. गोष्ट एक चित्रपट अनेक

३४. काम कमी फाईली फार

३५. लाच घे पण जाच आवर

३६. मंत्र्याच पोर गावाला घोर

३७. मरावे परी मूर्तिरुपे उरावे

३८. नटीच्या लग्नाला सतरा नवरे

३९. मिळवत्या मुलीला मागणी फार

४०. रिकामी मुलगी शृंगार करी

४१. प्रेमात पडला हुंडयास मुकला

४२. दुरुन पाहुणे साजरे

४३. ऑफीसात प्यून शहाणा

४४. सत्ता नको पण खैरनार आवर

४५. एक ना धड भाराभर पक्ष

४६. हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे

४७. थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे

४८. तोंडाला पदर गावाला गजर

४९. कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं

५०. रात्र थोडी डास फार

५१. शिर सलामत तो रोज हजामत

५२. नेता छोठा कटआऊट मोठा

५३. चिल्लरपुरता सत्यनारायण

५४. दैव देते आयकर नेते

५५. डीग्री लहान वशिला महान 


५६.  राहायला नाही घर म्हणे लग्न कर !

५७.  सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !

५८.  खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !

५९. मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !

६०. चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !

६१.  चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !

६२.  ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !

६३.  नाजुक मानेला मोबाईलचा आधार !

६४.  मनोरंजन नको रिंगटोन आवर !

६५.  स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !

६६.  जागा लहान फ़र्निचर महान !

६७. उचलला मोबाईल लावला कानाला !

६८.  रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार !

६९. काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं !


करा शेअर...

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top