एक अप्रतिम पोस्ट वाचण्यात आली। आयुष्यात पुढील गोष्टींचा आपण सर्वानी मनापासून स्वीकार करायला हवा!!

1 ) माझा जन्म कोठे व्हावा ..कोणत्या जाती धर्मात व्हावा..आई वडील कसे असावेत ..हे माझ्या हाती नव्हते ..त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऎवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करुन माझे जिवन नक्कीच सुखी करु शकतो...

२ ) मी स्त्री व्हावे की पुरूष..काळा की गोरा..माझ्या शरिराची ठेवण ..सर्व अवयव ठिकठाक असणे..हे देखिल माझ्या हाती नव्हते..मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे..योग्य ती काळजी घेणे हे माझ्या हाती आहे...

३ ) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती..सामाजिक स्थान..त्यांचे स्वभाव ..हे देखिल माझ्या हाती नव्हते..त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे..

४ ) सगळ्यांनाच सगळे सुख मिळत नाही हा निसर्गाचा नियम आहे..त्या मुळे माझ्या आयुष्यात देखिल काही दुःखे असणारच आहेत..ती दुःखे कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही ..त्यामुळे माझ्या दुःखाचे भांडवल न करता..मी त्या दुःखाचे निराकरण करण्या साठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन..

५ ) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी ..माझ्या संपर्कात येणा-या लोकांनी ..माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले तरी मी त्यांच्याशी प्रेमपुर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे..संयम..म्रुदु भाषा..मंगल कामना हे माझ्या हाती आहे..

६ ) माझ्या आयुष्यात घडणा-या घटना..परिस्थिती ..यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते ..मात्र त्या वेळी साकारात्मक विचार अन योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे..!

७ ) हे विश्व मी निर्माण केलेले नाही ..कीवा हे विश्व कसे असले पाहिजे या माझ्या मताला देखिल काही कींम्मत नाही तेव्हा..हे असे का ? ते तसे का ?..असे का नाही ..? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी ..जे चूक आहे..अयोग्य आहे..ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल हे थोडके नसे..!

८ ) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दुःख मिळणार आहे याची जाणीव ठेवून मी माझ्या आसपासच्या दुःखी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे...!

९ ) आज जरी यश..सुख ..सम्रध्दी माझ्या पायाशी लोळण घेत असली तरी उद्या अथवा केव्हाही हे नष्ट होवु शकते याची सतत जाणीव ठेवून मी अहंकाराला दुर ठेवले पाहिजे...!

१० ) मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत रहाण्या ऎवजी . जे काही मिळाले आहे त्या बाबत मी आभारी असले पाहिजे..जग अधीक चांगले..सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये..!

साभार - प्रशांत पाटील

टिप्पणी पोस्ट करा Blogger

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top