होळी खेळण्यासाठी नसíगक रंगांचा वापर करणे सर्वात उत्तम. त्यामुळे अन्य गोष्टींवर व तुमच्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. गुलाल व अन्य नसर्गिक पाणीयुक्त रंग तुलनेने आपल्या शरीरासाठी सुरक्षित मानले जातात.

नैसर्गिक रंग..

* जांभळा रंग : बीट साल पाण्यात उकळून हा रंग तयार होतो.बिटाचे पाणी हाही एक चांगला ओला रंग आहे.

* पिवळा रंग : बेलफळाचे साल उकळून एक भाग हळद, दोन भाग पीठ मिर्शण करून हा रंग तयार होतो.पिवळी हळदीची पावडरदेखील एक नसíगक सुंदर पिवळा रंग तयार करते.
हळद, कस्तुरी हळद आणि बेसनाच्या पिठापासून पिवळा रंग तयार करता येतो. कोरडा रंग म्हणून त्याची एकमेकांवर उधळण करता येते. तसेच पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या किंवा नाजूक बहाव्याच्या फुलांच्या पाकळ्या सावलीत सुकवून घेतल्यानंतर त्यात बेसनचे पीठ मिसळल्यास कोरडा रंग तयार होईल. ओला रंग तयार करण्यासाठी या फुलांच्या पाकळ्या रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा. त्यात आवश्यकतेनुसार हळद टाकून मिश्रण चांगले उकळवून घ्या.


* काळा रंग : आवळ्याचा किस लोखंडी तव्यावर भाजून त्यावर पाणी टाकावे आणि उकळावे.

* लाल रंग : जास्वंदाची फुले, पळस, गुलाब आदी कुटून लगदा तयार करा व तो पाण्यात टाकून ढवळा. या फुलांना वाळवूनही रंग तयार होतो. लालसर चंदन पावडर ही एक उत्तम पर्याय असू शकते.
रंगपंचमीच्या दिवशी लाल रंगांचे आकर्षण काही औरच असते. लाल रंगात नखशिखान्त भिजून मित्र परिवाराच्या भेटीगाठी घेत दिवसभर फिरणाऱ्या तरुणाईच्या झुंडीच्या झुंडी दृष्टीस पडत असतात. लाल रंग तयार करण्यासाठी रक्तचंदनाचा वापर करता येऊ शकेल. रक्तचंदन आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. रक्तचंदनाच्या खोडाची भुकटी पाण्यात उकळवून थंड केल्यावर गडद रंग तयार होतो. तो पाण्यात मिसळून रंगपंचमी साजरी करता येते. तसेच मधुमेहींसाठी वरदान ठरणाऱ्या जास्वंदीच्या फुलापासूनही लाल रंग बनविता येतो. जास्वंदीची फुले नाजूक असल्यामुळे ती उन्हाऐवजी सावलीत वाळवून घ्यावीत. त्यापासून तयार केलेली भुकटी पाण्यामध्ये उकळवून घ्यावी. निर्माण होणारे जाड मिश्रण आवश्यकतेनुसार पाण्यात मिसळावे.


* नारंगी/
केशरी रंग : बेलफळाचा गर उकळल्यास हा नारंगी रंग तयार होतो. पांगाऱ्याच्या फुलांपासून केशरी रंग तयार करता येतो. पांगाऱ्याची फुले सावलीत वाळवून घेतल्यानंतर त्याची भुकटी बनवली की झाला कोरडा रंग तयार. ओला केशरी रंग तयार करण्यासाठी ही फुले रात्रभर पाण्यात भिजवावीत. त्यानंतर हे मिश्रण उकळविल्यानंतर ओला केशरी रंग तयार होतो. या रंगाला सुगंधही असतो.

* हिरवा रंग : गहू, ज्वारी, पालक, हिरव्या पानाचा लगदा, मेंदीची पाने कुटून ढवळणे किंवा मेंदीच्या पानांची भुकटी पिठात मिसळल्यावरही हा रंग तयार होतो.पालकाच्या पानाच्या कोरडय़ा पावडरीपासून सुंदर हिरवा रंग तयार होतो.
गुलमोहर, मेहंदीची पाने आणि गव्हाचे कोंब यांची भुकटी तयार करून रात्रभर एखाद्या पिठामध्ये भिजत ठेवा. कोथिंबीर आणि पालकच्या पानांचा लगदा तयार करून या मिश्रणात मिसळा. म्हणजे हिरवा रंग तयार होईल.




होळी खेळताना फक्त एवढंच लक्षात घ्या, रंग सुरक्षिततेने खेळा. तुमच्या त्वचेला, डोळ्यांना व केसांना अनसíगक रंगांपासून होणा-या दुष्परिणामापासून सावध राहा.

होळीच्या वेळेस कुठली काळजी घ्याल?
 
» त्वचेसाठी योग्य, असे हर्बल, नसíगक रंग किंवा नसíगक उत्पादनांचा वापर करा.
» सिंथेटिक रंग त्वचेवर दाह निर्माण करतात, त्यामुळे आंधळेपणाही येतो, म्हणून योग्य काळजी घ्या.
» अ‍ॅलर्जी असल्यास त्वरित योग्य ते उपचार घ्यावेत.
» रंग डोळ्यांत जाऊ नयेत म्हणून अशा वेळी डोळे मिटून घ्यावेत.
» रंग खेळताना तुमच्या शरीराचा अधिकांश भाग झाकला जाईल, असे कपडे घालावेत.
» होळी खेळायला जाण्याआधी तुमच्या केसाला व त्वचेला खोबरेल तेल लावावं.
» घराबाहेर पडण्याआधी हात, पाय, मान आणि चेह-यावर सनस्क्रीन लोशन लावणं आवश्यक आहे.
» डोक्यावर पाणी घेण्याआधी उडालेला रंग झटकून टाका.
» रंग काढण्यासाठी त्वचेवर साबण जबरदस्तीने घासू नका. त्याऐवजी दुधात सोयाबीनचं पीठ किंवा बेसन पीठ घालून ते हात, पाय आणि चेह-याला लावावं.
» केस कोमट पाण्याने व सौम्य अशा श्याम्पूने धुवावेत. त्यानंतर केसांना कंडिशनर लावा. जेणेकरून कंडिशनर तुमच्या केसांना मऊ बनवेल व रासायनिक रंगामुळे केसांना येणा-या कडकपणापासून केसांचं संरक्षणही होईल.
» धुतलेल्या केसांना टॉवेलने हलक्या हाताने पुसून कोरडं करा, केस कोरडे करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर टाळावाच.


आंतरजालावरून साभार - लोकसत्ता , प्रहार , दिव्य भारती

Post a Comment Blogger

 
Top