हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा महाराजा.....
होय महाराजा...


आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा टोरा, म्हातारे कोतारे, मिळान साजारो करतत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा असात त दूर कर रे महाराजा....
होय महाराजा.....


कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केला असात तर ता बाहेरच्या बाहेर निघाण जाऊं दे रे महाराजा......
होय महाराजा.....


कोणाक पोर होत नसात तर त्याक पोर होऊ दे, काम धंद्यात सर्वानका यश दे, पोरा टोराक शिक्षणात यश दे, कोणाचा लग्न जुळत नसात तर ता तुझ्या क्रुपेन जमानदे रे महाराजा......
होय महाराजा........


हे देवा महाराजा आज जो काय महाराष्ट्रात दुष्काळ पडलो हा, त्याचो तू नाय नाट कर आणि तुझ्या कृपा दुष्टीने भरभरून पाणी दे रे महाराजा........
होय महाराजा.......


हे देवा महाराजा आणि जो काय आजकाल पोरी टोरीन वर अत्याचार होतंत आणि जे करतत त्याचो नाय नाट कर रे महाराजा.....
होय महाराजा....


ह्या बघा देवक मी नारळ देऊन सगळ्यांच्या वतीने गराणा घातलाय. चला आता सगळ्यांनी पाय पडा आणि शिमगो खेळाक यवा आणि पाणी नाय वापरलास तर बरा व्हयत.

बोला होळी रे होळी,
पुरणाची पोळी

*** आपणा सर्वाना शिमग्याच्या मनपुर्वक शुभेच्छा***

Post a Comment Blogger

 
Top