प्रिय मित्रानो ..

  आपल्याकडून १५ ऑगस्ट २०१३ रोजी दादर येथील बालीका आश्रम मदत योजना, २६ जानेवारी २०१३ रोजी मुलुंड येथील चैनानि वृद्धाश्रम स्नेहभेट, २४ जून २०१२ रोजी माई सिंधुताई सपकाळ संचालित संमती बालनिकेतन मदत योजना , १३ नोव्हेंबर २०११ रोजी टिटवाळा येथील मुक्त बालिका भवन येथे मदत योजना.. ९ जानेवारी २०१२ रोजी खार येथील सिनियर सिटीझन स्पेशल केयर युनिट येथे क्रीडा दिन आणि१५ ऑगस्ट २०११ रोजी तळोजा येथील परम शांतीधाम वृद्धाश्रम मदत योजना राबवण्यात आल्या..या सर्व योजनांना तुम्ही भरभरून प्रतिसाद  दिला, सहकार्य केले त्याबद्दल आम्ही शतशः ऋणी आहोत !!

यंदा या नूतन वर्षी सुद्धा २६ जानेवारी २०१४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनमाझे सेवाभावी संस्था आणि हेल्पिंग हैण्ड तर्फे आम्ही आणखीन एक एकत्रित उपक्रम हाती घ्यायचे ठरवले आहे. बदलापूर येथील सत्कर्म बालकाश्रमाला भेट देऊन तेथील चिमुकल्यांबरोबर आपला वेळ व्यतीत करून ,काही स्पर्धा भरवून त्यांना बक्षीस, भेटवस्तू आणि देणगी द्यायचे ठरविले आहे. तसेच त्यांच्या सोबत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे.

या आश्रमातील निरागस चिमुकल्यांना भेट देवून आपण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलवन्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. या वस्तीगृहात अंदाजे २२ मुले  आहेत, त्यांना फळे, बिस्किट्स, चोक्लेट्स, केक आणि इतर भेटवस्तू देवु ..  तसेच विविध स्पर्धा भरवू ज्या योगे त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल.  या उपक्रमाला तुम्हा सर्वांचा योग्य प्रतिसाद लाभेल अशी आम्ही आशा करतो !!

आपणास या उपक्रमात सामील व्ह्यायचे असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

सचिन हळदणकर : ९८६९२५७८०८ ( Central Line - 9869257808 )
संजय नायकवाडी: ९८१९००४०४९ ( Central Line - 98 19 004049 )
धनाजी सुतार : ९९३००९२३०७ ( Harbor Line - 9930092307 )
देवेन सकपाळ : ९०२२२६०७६५ ( Western Line - 9022260765 )
रोहित वेलवंडे : ९८७०५८५८३१ ( Central Line - 9870585831)
अरविंद गणवे ९८७०५९५४५९ ( Harbor Line - 9870595459 )

नोंद: ज्याना शक्य असेल त्यानी शुभ्र वस्त्रे परिधान करून यावे.

-- आभार
मन माझे सेवाभावी संस्था आणि हेल्पिंग हैण्ड

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top