१२ राशींचे वार्षिक भविष्य २०१४ 

मेष :
 मेष राशीच्या व्यक्तींना धनाची जास्त लालसा नसते. मात्र जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या मुलभूत गोष्टींसाठी परिश्रम करण्याची देखील त्यांची तयारी असते. त्यामुळे गरजेपुरता का होईना धनप्राप्ती करण्याची त्यांची धडपड सुरू असते.

जर आपण परदेशी नोकरीसाठी चिंतेत असाल तर काळजी करू नका, इतरांपेक्षा तुम्ही कौंटुबिक स्तरावर फारच उत्तम जीवन जगत आहात. येत्या काळात तुम्ही उद्योग-व्यवसाय केल्यास फारशा अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तरुण, विद्यार्थी आणि महिलांना धनप्राप्तीसाठी चांगलेच कष्ट उपसावे लागतील. पुखराज आणि निलम रत्न धारण केल्यास धनप्राप्ती होण्यास मदत होईल. श्रीयंत्र, कुबेरयंत्र आणि व्यापारवृद्धी यंत्राची पूजा करणं हितकारक ठरेल. या वर्षाचा पूर्वार्ध व्यवसायासाठी अतिशय योग्य आहे. त्यामुळे समृद्धीची फारच चांगली संधी आहे. जमीन-जुमला, खाणव्यवसाय, पोलाद आणि लोखंड व्यवसायात मेष रास ही एकमेवाद्वितीय मानली जाते. २०१४ मध्ये चांगलाच धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


वृषभ:

 अर्थार्जनाच्या बाबतीत वृषभ राशीची माणसे अत्यंत कुशल आणि निसंकोची असतात. तुमच्या नातेवाईकांच्या सहकार्याने आर्थिक चक्र चालू राहील. जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत. राजकीय किंवा खासगी सेवेशी निगडीत क्षेत्रात काम करीत आहेत त्यांना दिवस-रात्र धावपळ केल्याने उत्तम धन प्राप्ती होऊ शकते.

नववर्षात कुटुंबातील सदस्यांची चांगली आर्थिक उन्नती होईल. तर मित्रांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होईल. अनेकांना नोकरीपेक्षा व्यवसायातून जास्त नफा मिळेल. बुद्धी आणि कलेच्या जोरावर या राशीतील व्यक्ती या धनलाभ करून घेऊ शकतील. जे आधुनिकेतेची कास धरून राहतील त्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात लाखोंचे पॅकेज मिळू शकेल. अनेक दिवसांपासून थांबून राहिलेली पदन्नोती किंवा स्थळ परिवर्तन, परदेश दौरा याचा लाभ होऊ शकतो. उद्योग-व्यवसाय सुरू करायचा झाल्यास केमिकल, औषध, उपचारांची साधने, वाहने आणि सेवाकारी कार्यांमध्ये चांगली कमाई करता येईल.
 


मिथुन:

 आजच्या काळ हा बदलाचा आहे. त्यानुसार मिथुन रास ही सर्वाधिक लाभासाठी लवकरात लवकर बदल स्वीकारणारी असते. मिथुन राशीच्या व्यक्तींना शिकण्यासाठी किंवा शिकविण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. यांचा उद्देश रचनात्मक असा असतो. कामामध्ये चालढकलपणा यांना अजिबात आवडत नाही.

मिथुन राशीचे व्यापारी वर्गासाठी नववर्ष फारच फायदेशीर आहे. कार्यक्षेत्रातील तणाव कमी होईल. मशिनरी, किराणा किंवा अन्नधान्य यांच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. तांत्रिक किंवा जोखमीयुक्त कार्यामध्ये लाभ मिळेल. सेवा क्षेत्र, संस्था यांना चांगला लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मिथुन राशीच्या महिलांना नववर्षाचा पूर्वार्ध फारच उत्साहवर्धक असणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी पासून मे जून महिन्यापर्यंत रोजगार प्राप्त होईल. साधनसंपत्तीच्या व्यवस्थेसंबंधी कार्यामध्ये आपली जाण फारच लाभदायक सिध्द होईल. यात्रा संभावते. जर आपण अविवाहित असाल तर या वर्षाच्या उत्तरार्धात विवाहासंबंधी होणारी चर्चा सफल होईल. कला संगीत आणि साहित्य तसेच मनोरंजन आणि फॅशनशी निगडीत असणाऱ्य महिलांना देखील हे वर्ष फारच चांगले राहणार आहे.
 


कर्क:

कर्क रास ही व्यवहरिक रास आहे. कसेही वातावरण किंवा परिस्थिती असो यांना आपलं स्थान प्राप्त तात्काळ जमतं. कोणाची आर्थिक मदत मिळो अथवा न मिळो स्वत:च्या ताकदीवर ते त्यांचं साम्राज्य निर्माण करतात.

कर्क राशीच्या युवकांना आणि ज्येष्ठा नागरिकांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१४मध्ये चांगलाच धनलाभ होईल. घर , वाहन आणि सुखद यात्रा यामध्ये गुंतवणूक करता येईल. २०१४ वर्षात निवडलेल्या कार्यक्षेत्रात फारच मोठी सफलता मिळेल.

तर महिलांसाठी हे वर्ष विशेष लाभदायक ठरणार आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वस्त्र , आभूषणे याचा लाभ होईल. जर आपण युवक असाल आणि नोकरीच्या शोधार्ध असल्यास फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आपल्याला रोजगार उपलब्ध होईल. बहुधा फारच लवकर तुमच्या रोजगारामध्ये सुधारणा होईल.

काहीजणांना या वर्षी विशेष प्रयत्नांनंतर मनाप्रमाणे लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यांना असा सल्ला आहे की , आपल्या व्यक्तीगत जन्मकुंडली आणि ग्रहदशा सुधारण्यासाठी लक्ष्मी व्रत करावं. यासोबतच चतुर्थी आणि एकादशी व्रत केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.
 


सिंह:

 सिंह राशीची माणसे सर्वसाधारणरित्या स्वच्छ मार्गाने पैसे कमावणे पसंत करतात. जे काही आपल्याला मिळेल त्यात समाधानी राहण्याकडे त्यांचा कल असतो. म्हणूनच सिंह राशीचे लोक व्यवस्थापन, सल्लागार क्षेत्रात चमकताना दिसतात.

नव्या वर्षात नोव्हेंबरपासून डिसेंबरपर्यंत सर्व तरुण आणि प्रौढ सिंह राशीच्या माणसांना उत्तम धनप्राप्ती होईल. जे सिंह राशीचे विद्यार्थी आहेत त्यांना एप्रिल-मे नंतर शुभकाळ आहे. अनेक सिंह राशीची माणसे आपल्या नोकरीसह व्यापारातूनही धनप्राप्ती करतात. त्यांना व्यापरात संघर्ष कायम राहणार असला तरी त्यांचा समजूतदारपणा, कामतील तत्परता आणि शिस्तप्रियता हे गूण मदत करतील.

महिलांसाठी हे वर्ष उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरेल. कामामध्ये त्या आपल्या कार्यक्षमतेने प्रभावित करतील. लाभाचे काही योग त्यांच्या राशीमध्ये लिहिलेले आहेत. जरी काही सिंह राशीच्या व्यक्तिंना उपजिविका आणि व्यवहारात काही संकटांना सामोरे जावे लागणार असले, तरी श्रीयंत्र, सूर्ययंत्र आणि गणेश यंत्राच्या स्थापने त्यांना दिलासा मिळेल. आपल्या घरी किंवा कार्यालयीन ठिकाणी त्यांनी ही स्थापना करावी. नवग्रहांची माळ गळ्यात घालावी आणि शक्य असेल तर तर रविवारी गोग्रास द्यावा.
 



कन्या:

 कन्या राशीच्या व्यक्तींसाठी २०१४ हे आर्थिक लाभाचे वर्ष ठरणार आहे. जानेवारी ते मार्च या महिन्यात तुमच्यासाठी आर्थिक लाभाचे नवे स्त्रोत पुढे येतील. या काळात तुम्ही एखादा नवा उद्योग वा व्यवसाय सुरू केल्यास नव्या वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला मोठ्या यशाची चव चाखायला मिळेल. तसेच तुमच्या मिळकतीतही वाढ होईल. कन्या राशीचे जे लोक आपल्या कौशल्याचा व तांत्रिक ज्ञानाचा वापर करून पैसे मिळविण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी एप्रिल ते जून दरम्यानचा काळ उत्तम आहे. विज्ञान, वाणिज्य तसेच मीडिया, लेखन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना त्यांच्या क्षमतेनुसार आर्थिक फायदा मिळविण्यात यश मिळेल.

२०१४मध्ये शनीची साडेसाती नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत असेल. त्यामुळे शनी प्रतिकूल असलेल्यांना बराच संघर्ष करावा लागेल. शनी यंत्र आणि मंगळ यंत्राची पूजा तसेच शिवस्तोत्र व गणेशमंत्राचा जप केल्यास मनोकामना पूर्ण होतील. समर्थक आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला जास्तीत जास्त सहकार्य घ्यावे लागेल.

तुमच्याकडे जमा असलेला पैसा-अडका अत्यंत विचारपूर्वक खर्च करावा लागेल. मुलांची लग्नकार्य, घर, वाहनांवर खर्च होईल. ज्या क्षेत्राचा योग्य अनुभव वा पूर्ण माहिती नाही त्यात पडायची जोखीम टाळावी लागेल. 


तुळ:

 शनीच्या साडेसातीमुळे तुळ राशीच्या लोकांना नवे वार्ष थोडे कष्टप्रद आहे. जर आपण मोकळ्या मनाने जगू इच्छित असाल तर आपल्या व्यापारात आणि एकंदरीत मार्गात अडचणी हात जोडून उभ्या राहतील. आपल्या धैर्याची आणि मेहनतीची परीक्षा लागणार असली तरी प्रयत्न सोडू नका.

युवक आणि प्रौढ यांच्यासाठी उपजीविका करताना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. आपल्या प्रवासात अनेक चढ-उतार येतील. कोणत्याही पद्धतीचा धोका पत्करणे अडचणीचे ठरू शकते. वारंवार व्यापार बदलणे, त्यात काट-काट करणे फायदेशीर ठरणार नाही. मार्केटींग आणि कमिशन किंवा डॉक्टर, वकील, माध्यमातील लोकांना वर्षाच्या उत्तरार्धात विशेष संधी मिळतील. सराफ, सोने-चांदी, धातू, निर्माणकार्य, लोखंड, सिमेंट, कृषी या क्षेत्रांमध्ये असलेल्या तुळा राशीच्या लोकांना वर्षभर नफा-तोट्याचा प्रभाव सहन करावा लागेल. अधिक कर्ज किंवा व्याजाच्या फे-यात अडकू नका.

तुळ राशीच्या महिलांसाठी नवे वर्ष खर्चिक आणि आर्थिक चढ-उतारांचे असणार आहे. जर आपण नोकरी करणारे असाल तर अधिक खर्च करणे नुकसानकारक असू शकेल. यात आनंदाची गोष्ट अशी की आपल्याला आपल्या कुटुंबियांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. पण सावध राहा, या जवळच्यांपैकी कोणीतरी आपल्या आर्थिक समस्येचे कारण ठरत नाही ना ? याची काळजी घ्या.
 
 


वृश्चिक:

 नववर्षच्या दरम्यान एका नव्या संकल्पासह आपण आपली क्षमता आणि शक्ती यांच्या जोरावर अनुकूल कार्यात सफल होऊ शकतात. फेब्रुवारी, मार्चनंतर मंगळ आपल्यासाठी फारच अनुकूल असणार आहे. नववर्ष सुरुवातीला कितीही कठोर वाटलं तरीदेखील याचा शेवट मात्र गोड असणार आहे. तुम्ही असेही काही कार्य कराल की, जे तुमच्या व्यवहार बुद्धीपेक्षा फारच विपरीत असेल. एप्रिल, मे महिन्यात तुमची चांगलीच गडबड असेल. जमीनजुमला, संपत्ती, कमिशन आणि इतर एजन्सी कामामध्ये आपले भाग्य उजाडेल.

वृश्चिक राशीच्या प्रोढ आणि ज्येष्ठांना या वर्षी आपल्या जमा खर्चाचा योग्य उपयोग करणं अत्यावश्यक आहे. तुमच्यावर सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारी देखील असणार आहे. मुलांच्या विवाहानंतर घर, वाहन याच्या खर्चात वा होईल.

वृश्चिक राशीच्या महिलांना नववर्ष हे शिक्षणात आणि करिअरमध्ये चमकण्यासाठी विशेष योगदान देता येईल. शनिच्या साडेसाती यामुळे त्यांना रोजगार प्राप्त होईल. तर दुसरीकडे कर्मठ आणि बौद्धिक क्षमता यामुळे त्यांना प्रगती करण्यास मोठा वाव आहे. सरकारी किंवा खासगी क्षेत्रात आकर्षक पॅकेज मिळू शकतं.
 


धनु:

 अनेक दिवसांपासून खोळंबलेली कामे यावर्षी पूर्ण होतील. आरोग्याच्या अडचणी दूर होतील. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत धार्मिक कार्य करण्यास तुम्ही सज्ज राहाल. तुमच्या कुंडलीत प्रवासाचा योग आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत तुमच्या कुटुंबियांच्या सदस्यांचा भाग्योदय होईल. एका सदस्याला आर्थिक लाभ होईल. एप्रिल महिन्यात खर्च आणि उत्पन्न, दोन्ही वाढतील.

तरुणांना दाम्पत्य किंवा संतती सुख प्राप्त होण्याची अपेक्षा. मार्च ते ऑगस्टदरम्यान संतती प्राप्त होण्याची शक्यता. बौद्धिक अथवा सल्लागार सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्यांना मे आणि जून महिन्यात पदोन्नतीचा लाभ होईल. जुलै ते ऑगस्टदरम्यान घर किंवा अचल संपत्तीचा लाभ होईल. नवे वाहन घरी येण्याचा योग आहे. एकूणच यंदा अखेरचे चार महिने अत्यंत उत्साहवर्धक आणि सुख प्राप्तीचे असतील.

शिक्षण, पत्रकारिता, प्रसारमाध्यमे, मार्केटिंग आणि अर्थिक क्षेत्राशी संबंधित महिलांना हे वर्ष चांगले जाणार. धनु राशीच्या लोकांना संघर्ष आणि थोड्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. काही महिन्यानंतर वाईट दिवस जाणार, हे मात्र नक्की. उपाययोजना म्हणून त्यांनी प्रदोष व्रत ठेवावे
 


मकर:

 यावर्षी शनी दशम स्थानावर राहुसोबत राहणार आहे. सूर्य, बुध, शुक्र आणि चंद्र वर्षाच्या सुरूवातीला व्ययस्थानातून जात आहेत. केतू चौथ्या आणि गुरू सहाव्या स्थानी आहेत तर मंगळ नवव्या स्थानाच्या अग्रभागी आहे. बुध सहाव्या स्थानी असून तीन-चार महिन्यांनंतर सप्तम राशीत प्रवेश करणार आहे. शनीचा कर्मभाव दिसेल तर राहुमुळे वर्षभर तुम्हाला धनलाभाच्या अनेक संधी चालून येतील. गुरू वर्षाच्या उत्तरार्धात सप्तम स्थानी असेल हा काळ शुभ कार्यांसाठी उत्तम असा असणार आहे. मांगल्या तुमच्या अंगणात येईल. या काळात तुम्ही तल्लख तर असालच पण दैनंदिन व्यवहारातही तुमच्या चाणाक्ष्यपणाची चुणूक दिसेल.

मकर राशीच्या महिला उमदं व्यक्तिमत्व आणि व्यवहारातील चोखपणा यामुळ वर्चस्व गाजवतील. सरकारी वा खासगी नोकरीत, कला-संगीत आणि मीडिया अशा सर्वच क्षेत्रात मकर राशीच्या महिलांचा दबदबा पहायला मिळेल.
 


कुंभ:

 कुंभ राशीचा स्वामी शनी नवव्या स्थानावर राहुबरोबर भ्रमण करीत आहे. सूर्य, बुध आणि शुक्र दहाव्या घरात, चंद्र विसाव्या घरात, गुरु पाचव्या घरात तर केतु तिसऱ्या घरात आहेत. या ग्रहयोगाबरोबरच चंद्र आणि बुधही दहाव्या घरात स्थिरावले आहेत. चंद्र आणि गुरूचा त्रिकोण योग आहे. वर नमूद केल्याप्रमाणे ग्रहांची स्थिती असणे म्हणजे आर्थिक भरभराटीचे लक्षण आहे. केतु तिसऱ्या स्थानी असल्याने तुम्हाला अप्रत्यक्ष आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पैसे कमवण्यासाठी इतरांवर अवलंबून असणाऱ्यांवर लक्ष्मी प्रसन्न असेल तर मोठा आर्थिक लाभ होईल. लहान तांत्रिक कामांमध्ये प्रगती होईल. ग्रामीण आणि शहरी भागात प्रत्येक स्तरावर नोकरी आणि उद्योगाचा योग्य समतोल राखल्यास कुंभ राशीच्या चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कामगारांनाही फार कष्ट न करता चांगला धनलाभ होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र त्यासाठी या लोकांमध्ये एकी आणि सुसूत्रता असणे गरजेचे आहे.

कुंभ राशीच्या महिला बुद्धी व कौशल्याच्या बळावर कार्यलयांमध्ये नेहमीच चांगल्या पदावर असल्याचे दिसून येते. सामान्यपणे वैद्यकीय, वकिली, शिक्षण-प्रशिक्षण या क्षेत्रात कुंभ राशीच्या लोकांना जास्त रस असतो. याशिवाय खाद्य, हॉटेलिंग, बँकिंगप्रमाणेच आर्थिक क्षेत्रातील कामही या लोकांसाठी लाभदायक असते. कुंभ राशीच्या महिलांवर नेहमीच लक्ष्मी प्रसन्न असते. तरी त्या आपल्या अध्यात्मिक आयुष्यात जे काही व्रत वैकल्ये करतात त्याचा प्रभाव त्यांच्या जीवनशैलीवर दिसून येतो.
 


मीन:

 या वर्षी मीन राशीचा स्वामी असलेला गुरू ग्रह चौथ्या घरात चांगल्या स्थितीत आहे. आठव्या घरात शनी, राहू आणि गुरू असा त्रिकोण आहे. चंद्र आणि बुध यांचा सूर्य तसेच शुक्र ग्रहाशी केंद्र योग आहे. पुढील पाच महिन्यात गुरू कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शनी आणि राहू दीर्घ काळ आपल्या राशीत राहणार आहे.

मीन राशीच्या महिलांना हे वर्ष चांगले जाईल. मे आणि जून महिना महिलांसाठी लाभदायी आहे. उत्पन्नात वाढ होईल. ग्रहांची साथ लाभली नाही तर पुष्कराज अथवा नीलम धारण करा, फायदा होईल. 


आंतरजालावरून साभार - महाराष्ट टाईम्स
 

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top