एक मुलगी...

म्हणाल तर भोळी, म्हणाल तर खुळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥

ति रुसते, ति हसते, ति बड बड बडबडते,
कधी हळव्या, कधी फुंद, कविता सुन्दर करते..♥

हसता हसता गाली तिच्या,पड़ते सुन्दर खळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥

ति प्रेमळ, ति सोज्वळ, पण आहे भलतिच हट्टी,
राग, द्वेष, लोभीपणाशी, तिची कायमचिच कट्टी..♥

सगळ्यान्मधे असुनसुद्धा, सगळ्याहून वेगळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥

निळे डोळे, लाल ओठ, पाठीवर रुळती बटा,
गौर गुलाबी चर्येवर, उष:कालची छटा..♥

ति अशी, ति तशी, जणु ती सोनसळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

Top