प्राणी संग्रहालयात आलेल्या एका माणसाला तिथल्या एका वाघाने मारले.
ते पाहून एका माकडाने विचारले: " ओ वाघोबा! एवढी गर्दी होती त्या गर्दी मध्ये
तुम्ही एकाच माणसाच्या मागे होतात. सगळ्यांना सोडून त्यालाच का मारलं?"

वाघ: " अरे मारू नाहीतर काय? अर्धा तास झाला माझ्याकडे बघून बोलत होता,
" एवढी मोठ्ठी मांजर! एवढी मोठ्ठी मांजर!"
"मग... माझी सटकली रे!!! क्योंकी कुछ भी करनेका......... लेकिन अपना इगो हर्ट नहीं करनेका........." :P :D

--------------------------------------------------------

एका माणसाला तीन
भाषा बोलणारा पोपट दिसतो.
तो त्या पोपटाची परीक्षा घ्यायचे ठरवितो,
आणि काही प्रश्न विचारतो…..

माणूस – Who are you??
पोपट – I am Parrot.
माणूस – तुम कोण हो?
पोपट – मैं तोता हु l
माणूस – तू कोण आहेस???

पोपट – तुझा बाप !, २ वेळा सांगितले
तरी तुला समजत नाही का रे........ शिपुर्ड्या........????

(पोपट मक्या चा असतो... :P :P )
----------------------------------------------------------

एक अनोळखी कॉल

तो :- हे तुला bf आहे का ??
ती :- हो आहे ना, पण तुम्ही कोण बोलताय?
तो :-मी तुझा भाऊ बोलतोय ....वाट बघ मी घरी यायची मग पाहतो तुझ्याकडे .......:(
...
थोड्या वेळानंतर
आणखीन एक अनोळखी कॉल

तो:-हे तुला bf आहे का ?? :P
ती :-नाही नाही मला नाहीये...:x
तो:-मी तुझा bf बोलतोय...तू आज माझ हृदय तोडलीस...:(
ती :-नाही ..नाही ..नाही ..डार्लिंग माफ कर मला ....मला वाटल कि माझ्या भावाने कॉल केलाय
तो:-आता पकडली गेलीस ....मी तुझा भाऊच बोलतोय थांब आताच घरी येतो....


----------------------------------------

मुलगा : आई, तुझा जन्म कुठे झाला ?
आई : पंढरपुरलां
मुलगा : बाबांचां?
आई : नागपुरला .
मुलगा : माझा आणि ताईचा ?आई : तुझा पुण्याला , ताईचा ठाण्याला .
मुलगा : मग आपण सगळे एकञ कसे आलो ?

-------------------------------
मन्या लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.

इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?
"इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला.

"सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...

हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. .हि  मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!

------------------------------------------------


एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात.
घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात.

डाकू : म्हातारे तुझ नाव काय ?

म्हातारी : माझ नाव गंगुबाई ......

डाकू : मी तुला सोडून देतो...माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत

डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ?

म्हातारा : माझ नाव ग्यानबा पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात.......:D

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top