माझ्या मना रे ऐक जरा
हळवेपणा हा नाही बरा !

मधुमास तो मधुयामिनी,
दिसले कुणी हसले कुणी
पहिलाच तो क्षण जीवनी
पडली कशी मज मोहिनी ?
का भास तो होईल खरा ?

आवेग तो श्वासातला
ते ओठ होते कापरे
उभयांतला उपचारही
विरली क्षणातच अंतरे
गेला अचानक तोल पुरा !

फसवेच ते वय कोवळे
फसव्याच त्या संवेदना
स्वप्नास निर्दय जाग ये
मागे मुक्या उरल्या खुणा
अंधार येई काय भरा

गीत - शांता शेळके
संगीत - डॉ. सलील कुलकर्णी
स्वर - बेला शेंडे

Post a Comment Blogger

 
Top