ती : काय रे किती तुझी वाट पहायची,
सांग काय करू तुझ्यासाठी कि फक्त एकदा मुसळधार बरसशील तू ?
किती रे तुझी वाट बघून सतत ती खिडकी खोलायची
नेहमीच आलास असा भास होतो पण... बाहेर डोकावल्यावर कळते
तो नुसताच आभास असतो .... किती राग गावे तुझ्यासाठी आता तरी ये


तो:  सांग खरच काय करशील तू माझ्यासाठी ................ ?
सगळे राग गाऊन तर झाले तुझे आता काय करशील ?


ती :  तुझी वेड्यासारखी वाट पाहते ना मी .... म्हणून सगळे हसतात मला ....
तरीही हि तू येशील अशी आशा आहे मला ....
अजूनही खिडकी उघडीच आहे फक्त तुझ्यासाठी ......
मी इतकी आतुर आहे तुझ्यासाठी आणि तू मात्र येत नाहीस
फक्त एकदाच - फक्त एकदाच बेभान होऊन बरस ओली चिब व्हायचे आहे मला
तुझ्या थेंबा -थेंबा मधला स्पर्श अनुभवायचा  आहे
मला.....................




तो :   वेडीच आहेस तू एकदम..... तुझी तळमळ पहायची होती मला
माझ्यावर किती प्रेम करतेस ते पहायचे होते मला...
इतका मी आवडतो तुला?
तू सांगशील तेव्हा तुला हवा तसा बरसेन फक्त तुझ्यासाठी
मला तुझ्या मनातील भावना पहायच्या होत्या
म्हणून थोडा लपलो होतो पण तुझ्या डोळ्यातील व्याकुळता पाहून
आता पूर्णपणे विरघळलोय ........... खरच
पूर्वी मी असाच बरासायचो कधीही - कोठेही 
पण माझ्यासाठी आजपर्यंत कोणी इतके व्याकूळ झाले नाही पहिले होते.
मी सर्वस्वी तुझाच आहे ..............
आता मात्र तुझेच ऐकेन मी ........ आणि फक्त फक्त तुझ्यासाठीच बरसेन मी !!

साभार - कवियेत्री : तृप्ती कदम

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top