दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला, तुझी आठवण नाही

भेट तुझी ती पहिली, लाख लाख आठवतो
रूप तुझे ते धुक्याचे, कण कण साठवतो
वेड सखी साजणी हे, मज वेडावून जाई

असा भरून ये ऊर, जसा वळीव भरावा
अशी हूरहूर जसा गंध रानी पसरावा
रान मनातले माझ्या, मग भिजूनीया जाई

आता अबोध मनाची, अनाकलनीय भाषा
कशा गूढ गूढ माझ्या तळहातावर रेषा
असे आभाळ आभाळ दूर पसरून राही

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला, तुझी आठवण नाही

आंतरजालावरून साभार - आभार - लेखक / कवी : - सौमित्र
 

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top