बाहेरच्या जगात आपल्याकडून होणारे नाटकासारखे वागणे हळू हळू आपल्या स्वभावात उतरू लागते. लोक जगासमोर एक असतात आणि आपल्या आत वेगळे. कधी कधी बाहेरच्या जगातील ताण तणाव आपल्या आत उतरू लागतात. आपला मूळ स्वभाव हरवू लागतो.
काही लोक राग आल्याचा अभिनय करतात. ऑफिसात, मित्रांमध्ये किंवा इतर ठिकाणी प्रसंगी राग आल्याचे नाटक करावे लागते, पण तोच आपला स्वभाव बनण्याची दाट शक्यता असते. काळाच्या ओघात वागणे बदलते आणि स्वभावही बदलण्याची शक्यता असते. आपण आपल्या मूळ स्वभावाप्रमाणेच राहू यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असते.
आपण कधी कधी रागाला येतो, पण तो काही आपला मूळ स्वभाव नाही. बाहेरील राग आपल्या आत उतरू नये यासाठी काय करावे. आपल्या स्वभावात क्रोधाने प्रवेश केला की तो सर्वात आधी आपल्या विचारशक्तीला मारून टाकतो. त्यांनतर संवेदना मृत होतात. संवेदनाहीन मनुष्य म्हणजे पशूच.

श्रीकृष्णाच्या जीवनाकडे पाहा. जगातल्या सा-या गोष्टी श्रीकृष्णाने केल्या परंतु स्वत:साठीही वेळ काढायचे. गोकुळात असताना स्वत:साठी थोडा वेळ काढायचे. एकटेच वनात किंवा यमुनेच्या किना-यावर बसून बासरी वाजवायचे. संगीतामुळे आपल्या संवेदनांचे पोषण होते. ध्यानामुळे दृढता येते. एकांतामुळे नवजीवन मिळते. जेव्हा आपण स्वत:ला वेळ देवू, स्वत:कडे लक्ष देवू, तेव्हा जगातील बाहेरील आवरण बाहेरच राहील. तुमचे अंतरंग जसे आहे तसे, मूळ रूपात राहील. मन:शांतीचा हा मूलमंत्र आहे.
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook