"" हेलो !! बाबा कसे आहात तुम्ही ?
आज सकाळीच माझ्या मुलीने मला मिठी मारली
गालावर हळूच गोड चुंबन देत "HAPPY FATHERS DAY " म्हणाली
मी ही आश्चर्याने चमकून तिच्या डोळ्यांत पाहिलं
"अहो आईचा दिवस रोजच असतो आज तुमचा दिवस आहे " हळूच कानांत सांगितलं

हल्ली पाहतो की अनेक डे साजरे होतात
पण "" बाबांचा दिवस "" ह्याला फारसं इतकं महत्व नसतं
कारण बाबा म्हणजे नेहमीच तापट , ओरडणारा प्राणी असतो
त्यांच्याशी कितीही प्रेमाने बोलावं पण अंगावर येतो असा समज असतो

खरंच चांगला पिता होणं हे सोपं नाही कारण
नऊ महिन्याचा गोळा पोटात वाढवून प्रसुतीच्या
वेदना काय असतात हे दगडासारख्या बाबांना कसं कळणार?
फक्त घरखर्चाचा पगार देवून घर चालवणारा संसाराचा चालक हे काय जाणणार ?

आईशी जितकी भावनिक व लाडिक जवळीक मुलांशी असते
तेवढी जवळीक बाबांशी फारच कमी पण कामापुरती मात्र असते
कारण सकाळी मुळे झोपली असता हा चाकरमानी बाहेर पाडतो
आणि रात्री थकून घरी येतो तर झोपलेल्या मुलांची तोंडं पाहतो

पण झोपलेल्या मुलांचा हळूच पाप घेवून
GOODNIGHT म्हणणारा बाबा पण ह्या पृथ्वीतलावर आहे
त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मर मर मारून स्वतःच्या
इच्छा आकांक्ष्या मारून कष्टाची पुंजी त्यांच्यासाठी राखणारा बाबा पण आहे

असा म्हणतांत की आई नेहमीच मुलांची बाजू घेते
अन मुलांच्या चुका पदरांत घालून बाबांशी भांडते
अन एका बाजूला आई मुलाची टीम अन बाबा एकटेच लढतात
आपले कोणीच नाही म्हणत हार खात गुपचूप नांगी टाकतात

आई जशी बडबड करून आपले प्रेम व्यक्त करते
तसे बाबांना जमत नाही ते फक्त आतून प्रेम करतात
ते एकदम भावनांचा ब्लास्ट नं करता डोळ्यांतील अश्रू लपवतात
आपल्याला रडतांना कोणी पाहू नये म्हणून चेहऱ्यावर उसनं हसू आणतात

आई जर धरती सारखी आहे तर बाबा अफाट मायेचं आकाश आहे
आईशी चिकटून राहणाऱ्या पिल्लांनी हळूच वर मायेच्या छपराकडे पाहिलं का?
नेहमी प्रेमाचा पाऊस पडणाऱ्या बाबांची मात्र उपेक्षा होते
वरून कठोर आणि आतून मृदू असणाऱ्या बाबांच्या मानाचा वेध कधी घेतला का?

सखी तुलाही आठवते का? तु पहिलं दुडू दुडू पाऊल टाकत असता
दोन हात करून तोल सांभाळता तु मात्र आईच्या कुशीत विसावलीस
पण तुजे प्रत्येक पाऊल पडत असता चिंतेने तु पडू नये म्हणून
काळीज पिळवटनाऱ्या आपल्या बाबांना हाक नाही मारलीस ?

खरं सांगू मुलींच्या बाबतीत बाबा हा प्राणी
नेहमीच हळवेपणाची भूमिका बजावताना दिसतो
मुलगी म्हणजे परक्याचे धन म्हणत तिला अगदी
हृदयाच्या तिजोरीत जपतांना खूप काळजी घेत असतो

सासरी जाताना मंडपात आतल्या आंत हुंदका
देणारा बाबा कोठे तरी कोपऱ्यांत अश्रुना वाट करून देतो
हळूच आपल्या नववधू नटलेल्या परक्या धनाला
अश्रुपूर्ण निरोप देत "दिल्या घरी सुखी रहा " म्हणत आशीर्वाद देतो

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top