हळूच येतेस,आणि तुला वाटेल तेव्हा निघून जातेस,
कधीतरी तुझी वाट पाहायला लावतेस,
आणि कधीतरी माझ्या आधीच तिथे पोहचतेस,
खरच तू ही चक्क पावसा सारखीच..............
कधीतरी तुझ्या रेशमी केसात,
फेसाळलेला धबधबा दिसतो,
तर कधी तुझ्या डोळ्यात कडाडती वीज,
कधीतरी तू खूप जवळ हवीशी वाटतेस,
तर कधीतरी तुझी खूप येते कीव.
खरच तू ही चक्क पावसासारखीच........
कशीही असलीस तरी
तू अशीच बरसत रहावीस क्षणोक्षण,
कधी ना तुटावे तुझे नि माझे रणानुबंध...
आयुष्यभर आपण ज्याची वाट पाहतो,
तो कधीतरी येतोच आपल्यापाशी.......
हाच तर तो पाउस, आणि तू ही चक्क त्या पावसासारखीच...........
Khup Chan
ReplyDelete