चांदण्या रात्री तू माझ्या सोबत असावा
चंद्र पण तेव्हा लाजून बघावा

तुझ्या कुशीत मी कधी शांत पडावी
आणि हळूच तू मला कुरवाळत राहावा

एक एक शब्द ते भारी वाटावा
खेळ तो फक्त नजरे चा असावा

तो फक्त तू आणि मी समजावा
चांदण्या रात्री तू माझ्या सोबत असावा..


साभार - कवियेत्री : रुची

Post a Comment Blogger

 
Top