मी काही कवी नाही..
पण माझ्याकडून शब्दांची सांगड घालून
मी कविता लिहिली ती मी
तिला सतत डोळ्यासमोर ठेवून ....
प्रेम हे कोणी करत नाही
ते कळत नकळत होऊन जाते
असे बोलतात ....
तेच माझ्याबरोबर पण झाले,
मला ते का कसे नाही आले कळून....
मन घाबरत होते तिला विचारायला
कारण वाटत होते त्यामुळे
एक खूप चांगली मैत्रीण बसेन गमवून...
तरी सुद्धा एक दिवस सांगून टाकले
मनातले सर्व काही धाडस करून....
पण हे वास्तवात शक्य नाही
असे तिने मला दिली जाणीव करून....
अन सलग्नता (attachment ) खूप वाईट
असते तिनेच मला दिले लक्षात आणून ....
आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत
आणि यापुढेही राहणार हेहि आम्ही आहोत जाणून....
पण जाता जाता गेली जगण्याची एक नवीन उमेद देऊन....
मीही बोललो तिला कि मैत्रीचा हा ठेवा
ठेवेन मी आयुष्यभर जपून ....
तिला वाटते मी खूप मोठे व्हावे
अन एक दिवस नक्की यशस्वी
होईन मी निवडलेल्या क्षेत्रात
दाखवेन नाव कमवून ....
आता मी हि माझे पूर्ण लक्ष देत आहे
career कडे झोकून ....
खरचं खऱ्या प्रेमामध्ये खूप ताकद असते
त्यामुळे खूप बदल घडतात, करावेसे वाटतात
हे समजले हि असेल तुम्हाला
कदाचित माझी कविता वाचून ...
हि कविता वाचून तुम्हीही
कदाचित गेले असाल भारावून
पण आता मी माझा कविता लिहिण्याचा
छंद देत आहे सोडून ..
कारण आता तीच नाही आहे
माझ्या आयुष्यात हे कटू सत्य आहे ..
मग कवितेत भावनिक शब्द
मांडू तरी कोणाकडे पाहून ....
Note :- हि कविता काल्पनिक असून यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा संबंध नाही .....
साभार - कवी : राहुल बाजी
गाव ............. रसायनी, रायगड..एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची
गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती
तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे - ही आहे.
Fataka Ahe Re hi Kavita Baaaap
ReplyDelete