ओढणी


सायकलच्या चाकात, ओढणी अडकून राहिली
तिच्या चेहर्यावरची काळजी, मीही पाहिली

 म्हणाली नाही ती, की मदत हवी म्हणून
मीच गेलो विचारायला, मदत हवी का म्हणून?

खूपच घट्ट अडकून बसली होती, ती त्या चाकात
माझ्याकडे पाहून, हसत होती गालात

ओठ च नव्हते बोलत, नुसते डोळेही सांगत होते
ओढनिचे शरीरही, माझ्या स्पर्शाने थरथरत होते

हळूवार हातांनी तिला, बाहेर त्यातून काढले
तिनेही हसत हसत, माझे आभार मानले

परत जेव्हा ती तिच्या, खांद्यावर ओढली गेली
माझ्या स्पर्शाचा अनुभव, तीही तिला देत गेली.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top