एकदा विमानातुन एक पोपट आणि एक कुत्रा प्रवास करत असतात. पोपट एअर होस्टेसला बोलावतो.

एअर होस्टेस येते, "येस सर?"

"काही नाही, काही नाही, तु जा परत...", पोपट म्हणतो. असे ३-४ वेळा होते.
कुत्रा हे सगळे बघत असतो. न राहावल्याने तो पोपटाला विचारतो,
"काय रे, हे काय चाललय??"
पोपट म्हणतो, "काय नाय रे.. असच...
मज्जा ..."

कुत्रा विचार करतो, आयला! एवढासा पोपट आणि माज करतोय ???
मग कुत्राही असेच एअर होस्टेसला बोलावुन परत पाठवायला लागतो.
आणि पोपटाकडे बघुन म्हणतो, "असच...
मज्जा ...!"
पोपट आणि कुत्र्याचे हे चाळे बघुन स्टाफ त्यांना तंबी देतो.
तरीही न रहावुन पोपट पुन्हा एकदा एअर होस्टेसला बोलावुन परत पाठवतो.
या वेळी कॅप्टन स्वत: येउन दोघांनाही परत तंबी देतो,
"पुन्हा असं घडलं तर आम्ही गंभीर दखल घेऊ..."
आता कुत्र्याला रहावत नाही. तो पुन्हा हाच प्रकार करतो.
शेवटी सगळा स्टाफ जमा होतो आणि ३०००० फुट उंचीवरुन
पोपट आणि कुत्रा - दोघांनाही विमानातुन खाली फेकुन देतात.
पडता-पडता पोपट कुत्र्याला विचारतो,

"काय रे, तुला उडता येतं का?"
"नाही रे" कुत्रा म्हणतो.
"मग? माज कशाचा करत होतास???"  :-D :-D :-D
 

Post a Comment Blogger

 
Top