ती : आपण काही झाले तरी लग्न करतो आहोत, तु मला वचन दे. नाही तर मी जीव देईन…
तो : दिले, जा. तथास्तु !
ती : हे बघ, मला हे तुझे तथास्तु नाही आवडत..
तो : सवय, संकृत मधला हाच एक शब्द येतो मला.
ती : पण कधी कधी बोलले खरं होते रे..
तो : हो माहीत आहे.
ती : मग का ?
तो : माहीत नाही..
************************************************
ती : आपण लग्न कधी करतो आहोत रे ?
तो : लवकरच गं.. तुझ्या घरी बोलतो मी एकदा लवकरच.
ती : ह्म्म, मी वाट पाहत आहे..
तो : लवकरच होईल, हो म्हणतील अथवा नाही…
ती : मी तयार आहे.
तो : मी देखील.
ती : तीला सांगितले आहेस का तु ?
तो : हो गं, सांगितले आहे, तीच माझ्याबरोबर घरी येईल तुझ्या.
ती : मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही रे..
तो : मी देखील, व तुला माझ्या आधी जाऊ देणार देखील नाही..
ती : असे कसे होईल..
तो : होईल म्हणलो ना ? मग होईल.
ती : नाही झाले तर, तु जर नाही मिळालास तर आधी मी जाईन, तथास्तु !!
तो : हे… काय हा फालतुपणा…
ती : चिढलास काय रे ?
तो : नाही, पण वेडेवाकडे नको बोलत जाऊ…
ती : ठीक आहे, स्वारी.
************************************************
तो : कुठे आहेस गं ?
ती : अरे मी ऑफिसमधून निघते आहे.
तो : मी गेलो होतो घरी आज तुझ्या…मनाची तयारी कर.. आपण दुसरा मार्ग अवलंबतो आहोत.
ती : काय ? बाबा नाही म्हणाले का ?
तो : हो, धक्के मारुन बाहेर काढलं.
ती : काय ? असे कसे करतील ते ? त्यांनी तर मला हो म्हणाले होते..
तो : होतं कसं कधी कधी..
ती : पण आपल्याच बरोबर का ?
तो : तुला पुन्हा विचार करायचा आहे का ?
ती : नाही.
तो : मग मी वाट पाहतो आहे तुझ्या उत्तराची. आज पासून ४ दिवसानंतर कोर्ट जवळ भेट.
ती : हो. काय घेऊन येऊ ?
तो : जशी असशील तशी ये. काही घेण्याची गरज नाही आहे. नोंदणी करतो मी आज सेटींग लावता आली तर बघतो.
ती : खरंच. मी एकदा बोलू का घरी ?
तो : ह्म्म. तुझी इच्छा.. !
ती : मी ट्राय करते, नाही तर प्लान आहे तसाच.
************************************************
तो : सेटिंग झाले आहे, ३० दिवसाची वाट बघावी लागणार नाही.
ती : ह्म्म…
तो : सगळी तयारी झाली आहे, नोंदणी झाली की आपण मंदिरात जाऊ.
ती : ह्म्म्म..
तो : वेळेची काळजी घे, तुझे बाबा कळाल्या क्षणी रुद्रावतार मध्ये येतील.
ती : ह्म्म…
तो : मी गीता सांगत नाही आहे तुला..
ती : हम्म्म…
तो : काय झाले कोणी आहे का बरोबर ?
ती : ह्म्म.. नाही विचार करते आहे..
तो : आता विचार ? ह्या स्टेपला ?
ती : तो नाही रे.. घरचा…
तो : मग ठीक आहे… भेटू उद्या.
************************************************
तो : निघते आहेस ?
ती : हो निघाले..
तो : घरी बोललीस ?
ती : हो.. जाऊ दे..
तो : तु एकुलती एक आहेस… पुन्हा विचार कर वेळ आहे..
ती : केला मी विचार तथास्तु !!
तो : माझेच शब्द मलाच ?
ती : हो..
तो : तुझा हा अवखळपणाच माझा जीव घेतो..हे… लक्ष्यात आहे ना..
ती : हो.. सगळे तयार आहे.
तो : मी पोहचतेच आहे.
************************************************
तो मित्र : अरे एक लफडा झाला रे…
तो : काय झाले रे आता ?
तो मित्र : अरे कोणी तरी नेता गचकला आहे. सरकारी ऑफिसला सुट्टी दिली आहे.
तो : अबे…
************************************************
तो : अग एक अडचण आली आहे.
ती : काय झाले रे ?
तो : कोर्ट आज बंद आहे..
ती : अरे देवा..
तो : काय झाले..
ती : मी घरी चिठ्ठी सोडून आलो रे…
तो : ओह नो.. तुला काय बोलू आता मी…
ती : स्वारी.. काय करु मी आता..
तो : वाचली असेल का घरी कोणी आता ?
ती : मी टिव्ही समोर ठेवली होती.. आई आली असेल घरी..
तो : ओह.. बरं ठीक आहे मी बोलतो तिच्याशी.. ती मार्ग काढेल.
ती : ठीक आहे मी वाट पाहते आहे तुझी…
************************************************
तो : आपण आताच्या आता मनालीला जातो आहोत..
ती : काय ?
तो : हो..
ती : बरं…कोण कोण ?
तो : ती, तीची फॅमिली व आपण दोघे. गाडी घेऊन.. तीची.
ती : बरं. कुठे भेटू ?
तो : मी तुला भेटतो, एक तासात. मॉल समोर उभी रहा.
************************************************
ती : तु ड्राईव्ह कर ना थोडा वेळ ती दमली आहे..
तो : हो, करतो आहे थांबू थोडावेळाने पुढे तेव्हा मी करेन..
ती : तु गाडी पुढील धाब्यावर थांबव गं…पुढील आठवड्यात आपलं लग्न होईल..
तो : ह्म्म्म… होईल १००% होईल..
ती : तुम्ही का हसताय.. बघ ना रे…. कसे हसत आहेत ते..
तो : लहान आहेत गं..
ती : अरे… समोर बघ…………….. गाडी………… डिव्हाडर..
************************************************
धडाधडा… समोर चिता जळत होती..
सगळेच सुन्न असे कसे झाले..
त्याला कोणी सांगायचे ? कसे…
तिच्या आई वडिलांचा आक्रोश पाहिलास…
कोण समजावेल रे त्यांना एकुलती एक…
हो तो पण एकुलता एक… तो पण होता..
वाचला नशीबाने..
************************************************
डॉक्टर म्हणत आहेत वेड लागले आहे..
नाही वाटत यार.. त्याचे डोळे बघ ना..
पण तो एकच शब्द म्हणतो आहे पुन्हा पुन्हा..
तथास्तु !
*
*
*
तीने आपले वचन पुर्ण केले….
Post a Comment Blogger Facebook