ती आणि तिच्या स्वप्नातला राजकुमार....

ती.
जणू राजकुमारी.
स्वप्नं पाहणारी.
आजपर्यंत तिला कोणत्याच संकटाची कधी झळ लागली नव्ह्ती.
आपल्या बाबांच्या सुरक्षित छायेत जगणारी.
हसरी, सुंदर, जणू फुलपाखरू.

एक दिवस ती तिच्या बाबांपासून दूर जाते.
शिक्षणासाठी. वसतिग्रुहाचे नवीन कायदे.
तिची होणारी घुसमट.
घराच्या, बाबांच्या आठवणीने जीव व्याकुळ.
अशातच नवीन मित्र-मैत्रिणी भेटतात.
ती पुन्हा खुलते.

आणि एक दिवस तिला तो भेटतो.
तो.
दिसायला साधारणच.
साधाच. लाजाळू.
पण तिला जीवाभावाची मैत्रीण मानणारा.

तिनं मनात एक तसबीर रेखाटलेली असते.
तिच्या स्वप्नातील राजकुमाराची.
तिचे डोळे त्याला शोधतात, पण तो नाहीच सापडत.

अन अचानक एक दिवस एक वादळ येतं.
ती उन्मळून पडते.
आत्मविश्वास मोडून पडतो.
सगळीकडे अंधार.
कोणीच मदतीला नाही.

आणि एक हात तिच्या दिशेने येतो.
ती आधार घेते.
सावरते, अन समोर पाहते,
तर तिचा तो मित्र.
डोळ्यात आपुलकी अन ओठांवर हसू घेवून उभा.

आता तो तिचं कवच संरक्षक कवच बनतो.
जी संकटं येतात, पहिल्यांदा तो त्यांना भिडतो,
पण तिला झळ लागू देत नाही.

हळूहळू तिच्या मनातल्या राजकुमाराच्या कल्प्नेला तो छेद द्यायला सुरूवात करतो.
पण ती हट्टी.
नाहीच मानत.
तिला अजूनही वाटतं तिचा राजकुमार येईल.

तिच्या मित्राला जाणवतं, तो तिच्यासाठी फक्त एक मित्र आहे.
सगळ्यांसारखा. बस्स.
तो निराश.
चहूबाजूंनी संकटं चालून येतात.
तो निराशेच्या गर्तेत कोसळतो.
त्याला वाटतं, संपलं सगळं.
सगळी स्वप्नं रक्ताळलेली.

अन अचानक एक नाजुक हात त्याच्या दिशेने येतो.
त्याला आधार देऊन सावरतो.
त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.
समोर ती.
डोळ्यात पाणी.
तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्या समोर उभा असतो............
अन त्याच्या हातात स्वर्ग............


--
With Lots Of Love
Sachin Haldankar.


टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top