दिवस उजड़त गेला पण विचार काही संपले नाही .

पक्ष्यांचा किलबिलत सुरु झाला पण विचाराना शांतता लाभली नाही.


प्रत्येक सकाळी ठरवते विसरून जाईन तुला.

आणि प्रत्येक रात्री आठवल्याशिवाय झोप नाही येत मला,


कधी हे सगले संपेल कधी ह्या मनाला शांतता मिळेल.

अस वाटत हे आता माझ्या श्वासाबरोबरच थांबेल,


डोळ्यातले अश्रु पुसायची हिम्मत होत नाही .
कारन त्याना पण आता सुकायची सवय झाली.

दोष तुझा
नाही माझा आहे,

तुला विसरण्याचा हाच तर एक बहाना आहे,

बहाने लाख मिळाले तुला विसरायचे पण त्याचा उपयोग काही झालाच नाही ,

विसरून जायचे म्हंटले तरी ही मन तयार होतच नाही,

राहिले आयुष्य तुझ्या आठवनींच्या नावावर,

खेळ खेळतेय आयुष्याचा शेवटच्या वाटेवर,


मी गेल्यानंतर तुही खुप रडशील.
मग माझ्या आठवनीत तुही तळमळशील.....

साभार - कवियेत्री : रुशाली हरेकर 

Post a Comment Blogger

 
Top